शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सात-बारा द्या, ४०० रुपये घ्या!

By admin | Updated: May 22, 2017 00:41 IST

हमीदराने तूर विक्रीसाठी व्यापाऱ्यांचा फंडा

गिरीश राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : यावर्षी खुल्या बाजारात तुरीचे भाव अद्यापही चार हजारांच्या खालीच असताना शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासन ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटलने तुरीची नाफेडमार्फत हमीदराने खरेदी करीत आहे. मात्र, या भाव तफावतीचा गैरफायदा काही व्यापारी उचलत असून, खुल्या बाजारातून ३६०० ते ३८०० रुपये प्रतिक्ंिवटल दराने तूर खरेदी करून, नाफेडला हमीदराने विकून क्विंटलमागे १००० ते १२०० रुपये नफा मिळवित आहेत. नाफेडच्या केंद्रावर व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तूर विकण्यास आणताना अगोदर सातबारा आवश्यक असतो. पेरेपत्रक आवश्यक असून, पेरेपत्रकावर तुरीचा पेरा किती होता, हे नमूद असणे आवश्यक आहे. सोबतच तूर विक्रीचे पैसे नगदी देण्यात येत नसून, संबंधित सातबाऱ्यावर नमूद असलेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्डाची छायांकित प्रत सुद्धा घेण्यात येत आहे. एकूणच या केंद्रावर व्यापाऱ्यांनी तूर न विकता जो तुरीचे उत्पादन घेतो, अशा शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता येईल. मात्र काही शेतकरी क्षुल्लक लालसेपोटी किंवा कोणाचे तरी भले होते, या अनावश्यक भावनेच्या आहारी जाऊन आपला सातबारा, पेरेपत्रक, आधार कार्ड छायांकित प्रत व्यापाऱ्याला देतात व उलट व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केल्या जात असल्याचा आरोप करतात. आपल्या सातबाऱ्यांवर तूर विकून व्यापारी १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा शेकडो क्विंटलवर लाखोचा नफा कमवित असताना काही हुशार शेतकरी फुकटात सातबारा देण्यास तयार नसतात, अशा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे रक्कम देण्यात येत आहे. तर काही शेतकरी काहीही मोबदला न घेता सातबारा व इतर कागदपत्र व्यापाऱ्याच्या हवाली करीत आहेत. शेतकऱ्यांची कृती ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’!शासन शेतकऱ्यांसाठी हमीदराची योजना राबवित असताना यावर्षी भाव नसल्याने या केंद्रावर तुरीची आवक वाढून तारांबळ उडत आहे. मात्र संकट म्हणजे संधी असे समजत व्यापाऱ्यांकडून याच हमीदर केंद्रावर शेकडो क्विंटल तूर विकली जात आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर आधी मोजल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, व्यापारी हे शेतकऱ्यांच्याच सातबाऱ्यावर तूर विकत आहेत. तेव्हा व्यापाऱ्यांना सातबारा देणाऱ्या शेतकऱ्यांची ही कृती म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ अशीच म्हणावी लागेल.