शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरभरतीत प्राधान्य द्या : गंगाधर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाचे संकट ओढवले आहे. यामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या आरोग्य विभागात उपलब्ध कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर ...

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाचे संकट ओढवले आहे. यामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या आरोग्य विभागात उपलब्ध कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर प्रचंड ताण निर्माण झाला होता. त्यातच राज्य शासनाने काही ठिकाणी स्थायी, तर काही ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कोविड केअर सेंटरची उभारणी केली होती. शासनाने संबंधित सेंटरवर कर्मचारी भरतीप्रक्रिया राबविली होती. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स ,क्ष-किरण तंत्रज्ञ ,लॅब असिस्टंट, डॉक्टर्स, सफाई कामगार आणि इतर कर्मचारी अशा शेकडोच्या संख्येने अस्थायी स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया केली. परंतु खेदाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आला त्या ठिकाणचे कर्मचारी सेवा थांबविण्यात आली आणि त्यांचे काही महिन्यांचे मानधन सुद्धा शासनाकडे आज रोजी थकित आहे. तरी सुरू असलेल्या भरतीप्रक्रियांमध्ये विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती गंगाधर जाधव यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शासनाकडे केली आहे.

गरज सरो आणि वैद्य मरो

प्रचलित म्हणीप्रमाणे ज्या कोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य मनुष्य घराच्या बाहेर निघण्यास धजावत नव्हता त्याच काळात उपरोक्त कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची अविरत सेवा केली. त्याच कर्मचाऱ्यावर आज बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. त्यांना फक्त कोरोनायोद्धा असे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यापलीकडे शासनाने त्यांचा आणि त्यांच्या परिवाराच्या भवितव्याचा विचार केला नाही.