शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय मुलींच्या नवीन वस्तिगृहांना माई रमाई आंबेडकर यांचे नाव द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 19:57 IST

बुलडाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मागासवर्गीय मुलींचे ५० वसतिगृह महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्या सर्व वसतिगृहांना माई रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे यांनी केली आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मागासवर्गीय मुलींचे ५० वसतिगृह महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्या सर्व वसतिगृहांना माई रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे यांनी केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी मोठ्या उत्साहात देशभर व राज्यात विविध कार्यक्रम राबवून व अनेक नव्या योजना सुरु करुन समाजामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. अशा बाबासाहेबांना वर्षभर विविध कार्यक्रम राबवून गौरव केला आहे. याच बाबासाहेबांना अगदी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून असंख्य अटी अडचणींना तोंड देवून कुटुंबाची व घराची जबाबदारी समर्थपणे संभाळून बाबासाहेबांना कोणत्याही प्रकारची अडचण माई रमाई आंबेडकर यांनी कधीच पुढे केली नव्हती. अशा माई रमाई आंबेडकरांचा महाराष्ट्र शासनने सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांना तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात सुरु करण्यात आलेल्या एकूण ५० वसतिगृहांना विशेष बाब म्हणून माई रमाई भिमराव आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह असे नामकरण करण्यात यावे, जेणेकरुन अशा माऊलीचा बाबासाहेबांसोबतच गौरव होईल. यासाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी निवेदन दिले आहे. निवेदनावर राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे, इंजि.शिवाजी जोहरे, समाधान चिंचोले, के.एम.वैरी, प्रमिलाताई चिंचोले, सचिन चंद्रे, प्रकाश डोंगरे, यशपाल लहाने, शरद खरात, मनोहर खराडे, विलास खंडेराव, संघमित्रा कस्तुरे, रमेश मिसाळ, प्रदीप जाधव आदींच्या सह्या आहेत.