शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रसवंती चालकांना आर्थिक पॅकेज द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:36 IST

रसवंतीसाठी शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करत असतो. बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लागवड केलेल्या ...

रसवंतीसाठी शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करत असतो. बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लागवड केलेल्या उसाला रसवंतीशिवाय पर्याय नाही. गत वर्षी लॉकडाऊनमुळे चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील लागवड केलेला ऊस तसाच वाळून गेला. यावर्षी सुद्धा संचारबंदी केल्याने रसवंती चालकांचा व्यवसाय ठप्प पडल्याने प्रामुख्याने रसवंतीसाठी लागवड केलेला ऊस तसाच पडून राहणार आहे. शिवाय सद्य:स्थितीत जिल्ह्यातील शेतकरी स्वत:च्या रसवंतीसाठीच उसाची लागवड करतात, त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बहुतांश रसवंती गावाबाहेर आहेत. गावात किंवा शहरात असणाऱ्या दुकानात फार मोठी गर्दी होते, असे कुठेही चित्र कोणत्याही रसवंतीमध्ये कधी पाहायला मिळाले नाही. रसवंती चालकांनी प्रत्येक ग्राहकांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. राज्य महामार्ग किंवा इतर रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने ही तर प्रवाशांच्याच भरवशावर चालतात. त्यामुळे संचारबंदी किंवा लॉकडाऊन काळात रसवंती चालक यांना रसवंती सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी व रसवंती चालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे. ग्राहकांअभावी पडून असलेला ऊस साखर कारखान्याला देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी केली आहे. त्यानुषंगाने चिखली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व रसवंती चालक शेतकऱ्यांनी देखील आ. श्वेता महाले यांची भेट घेऊन त्यांना रसवंतीसाठी परवानगी, आर्थिक पॅकेज व ग्राहकांअभावी पडून राहणाऱ्या उसाची व्यवस्था लावण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी अ‍ॅड. सुनील देशमुख, अ‍ॅड. दिलीप यंगड, विकास जाधव, आदींसह रसवंती चालक उपस्थित होते.