बुलडाणा : पावसाची अनियमितता आणि परतीच्या पावसाने ऐन हंगाम काढणीच्या काळात लावलेली वादळी हजेरी यामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्यांच्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील शेतकर्यांना हेक्टरी ५0 हजार रुपये मदत देण्याची आग्रही मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे प्रत्यक्ष भेट घेवून करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजु शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानीचा लढा शेतकरी हितासाठी असल्याने प्रसंगी स्वसत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरु असा सुचक इशाराही खा.शेट्टी यांनी दिला.बुलडाणा दौर्याप्रसंगी त्यांनी २२ नोव्हेंबर २0१४ रोजी सावरगाव डुकरे, मालगणी परिसरातील सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकर्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, राज्याचे प्रवक्ते गजानन अमदाबादकर, युवा प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार बाबुराव पाटील, राणा चंदन, भरत वाघमारे, नितीन राजपू त, विनायक सरनाईक आदी उपस्थित होते. सावरगाव डुकरे येथे शेतकर्यांकडून परिस्थितीत सोयाबीनच्या उत्पादनासाठी आलेला खर्च याचे वास्तव खा.शेट्टींनी जाणून घेतले. सोयाबीन लागवडीवर आलेला खर्चही निघण्याची शक्यता यंदा नाही. पीक आणेवारी देखील ५0 पै. आत निघण्याचा शासकीय आकडा आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे पिके नष्ट झाली असून सर्व बिकट परिस्थि ती पाहता विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन सोयाबीनला हेक्टरी ५0 हजाराची मदत आग्रही मागणी यावेळी खा.राजु शेट्टी, सदाभाऊ खोत व रविकांत तुपकर यांनी केली. शिवाय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही मागणी रेटून धरणार असल्याचे खा.शेट्टी म्हणाले.
हेक्टरी ५0 हजार मदत द्या
By admin | Updated: November 22, 2014 23:55 IST