आजही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात याची एक ना अनेक उदाहरणे आहेत. कुठल्याही कामाची जबाबदारी महिला घेत असून, ती यशस्वीपणे पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. येथील माजी प्राचार्य स्व. भाऊसाहेब इंगळे हे येथील बबनराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य होते. बबनराव विद्यालयातून १९९४ला ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मुलगा नसून पाच मुली आहेत. मुलींचे लग्न झालेली आहेत. ७ जून २०११ ला भाऊसाहेब इंगळे यांचे निधन झाले होते. मुलींचे लग्न झालेले असल्याने त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ह्या मोताळा येथेच राहत होत्या. दरम्यान, २४ जून रोजी त्यांच्या पत्नी यमुनाबाई इंगळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने कोणीतरी जवळचा नातेवाईक, चुलता हा मृतकावर अंत्यसंस्कार करत असतो; परंतु येथे त्या जुन्या रूढी आणि परंपरेला फाटा देत आईच्या इच्छेनुसार त्यांच्या मुली रंजना देशमुख, सुनीता निखाडे आणि वैशाली भोपळे या तिन्ही मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
मुलींनी दिला आईला चिताग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST