शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील मुलींनी आपला दबदबा कायम ठेवला

By admin | Updated: June 18, 2014 00:38 IST

मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४५ टक्के आहे.

बुलडाणा : यावर्षी दहावीच्या परिक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील मुलींनी आपला दबदबा कायम ठेवला असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४५ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील उत्ताणी होण्याचे प्रमाण सर्वात जास्त ९५.५५ असून सर्वात कमी उत्तीर्ण होण्याचे प्रमाणत शेगांव व नांदूरा तालुक्याचे आहे. या दोन्ही उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७८.४९ आहे. तर जिल्ह्यातील ६२ शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे.** तालुकानिहाय निकालसिंदखेडराजा९५.५५ देऊळगावराजा९३.३८ चिखली९२.८९ बुलडाणा९२.५९ मोताळा९0.८९ लोणार८८.0९ संग्रामपूर८७.४४ मलकापूर८५.३९ मेहकर८३.८२ खामगाव८२.४३ शेगाव७८.४९ नांदूरा७८.४९ जळगाव जामोद७८.५६ 

** असे आहेत गुणवंतप्राविण्य श्रेणी - ६९४५  प्रथम श्रेणी- १३,१४0 द्वितीय श्रेणी - १0,९९१ पास श्रेणी - २१८५ ** ६१ शाळांचा १00 टक्के निकालबुलडाणा : शालांत प्रमाणपत्र परिक्षेत बुलडाणा जिल्ह्यात ६१ विद्यालयाचा आपला १00 टक्के निकाल दिला आहे. बुलडाणा तालुक्यातील शारदा ज्ञानपिठ, विवेकानंद विद्यालय, सव, शरद पवार विद्यालय वरुड, सेंट जोशप हायस्कुल, छत्रपती माध्यमिक विद्यालय, सहकार विद्या मंदिर, मौलाना अब्दुल कलाम आझाद उदरु हायस्कुल, नवनाथ माध्यमिक विद्यालय, गुम्मी, भास्करराव शिंगणे विद्यालय, डोमरुळ या महाविद्यालयाचा १00 टक्के निकाल लागला.तर मोताळा तालुक्यातील जि.प. हायस्कूल, डॉ.झाकीर हुसेन उदरु हायस्कूल, श्री चांगदेव विद्यालय. चिखली तालुक्यातील सरस्वती विद्यालय, श्री सिद्धेवर विद्यालय, राधाबाई खेडेकर विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, छत्रपती संभाजी विद्यालय आणि शिवाजी राजे विद्यालय, सुर्यभान बापू विद्यालय, जानकीदेवी विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राजमाता जिजाऊ मुलींची शाळा, गुरुकृपा विद्यालय. देऊळगावराजा तालुक्यातील मा.ज्योतिबा फुले हायस्कूल, श्री शिवाजी विद्यालय, श्री लालबहादुर शास्त्री विद्यालय, लक्ष्मीबाई आश्रम शाळा, सहकार महर्षी स्व.शिंगणे विद्यालय आणि भास्कररावजी शिंगणे हायस्कूल, सहकार विद्यामंदीर. सिंदखेडराजा तालुक्यतील श्री शिवाजी हायस्कूल, जनता विद्यालय, जिजामाता विद्यालय, यशवंतराव चव्हाण विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, वैभव विद्यालय. लोणार तालुक्यातील शारदा विद्यालय, सरस्वती विद्यालय, ज्ञानदिप आश्रमशाळा आणि गुरुकृपा विद्यालय. मेहकर तालुक्यातील पीर मोहम्मद हायस्कूल विद्यालय, विद्यामंदीर. खामगाव तालुक्यातील एस.एम.लाडे शिंगणे विद्यालय, पृथ्वीराज चव्हाण विद्यालय, लॉन्स ज्ञानपिठ, श्री.संत नारायण महाराज विद्यालय, श्री.जे.पी.पाटील हायस्कूल, जागृती ज्ञानपिठ, निवासी मुकबधिर स्कूल, मातोश्री जे.जे. मेहता सरस्वती विद्यालय. शेगाव तालुक्यातील नारायणरावजी वानखेड हायस्कूल, श्री. संत गजानन महाराज इंग्लीश हायस्कूल. नांदुरा तालुक्यातील एम.पी.कोठारी इंग्लीश कॉन्व्हेट. मलकापूर तालुक्यातील भारतभारती कॉन्व्हेंट, विद्या विकास विद्यालय, लक्ष्मी विद्यालय. जळगाव जामोद तालुक्यातील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपिठ, खॉजा मोईनोद्दीन चिस्ती आणि सातपुठा कॉन्व्हेंट तसेच संग्रामपुर श्रीराम वानखेडे विद्यालय या विद्यालयाने शंभर टक्के निकाल देण्याचा बहूमान मिळविला. ** बुलडाणा तालुका बुलडाणा : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा ऑनलाईन निकाल १७ जूनरोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून बुलडाणा तालुक्याची टक्केवारी वाढली असून ९२.५९ टक्के निकाल लागला आहे. तर तालुक्यातील नऊ विद्यालयाचा १00 टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परिक्षेसाठी तालुक्यातून ४ हजार ९४४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी ४ हजार ९२८ विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष परिक्षा दिली. यात ४ हजार ५६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.** चिखली तालुकाचिखली : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आले असून यामध्ये चिखली तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९२.८९ इतकी आहे. तालुक्यातील एकूण ६४ शाळा व माध्यमिक विद्यालयांपैकी यावर्षी तब्बल १२ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे.** मेहकर तालुकामेहकर : मेहकर तालुक्याचा सरासरी निकाल ८३.८२ टक्के लागला आहे. यावर्षी एकूण ३९३४ पैकी ३९१२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यातील ३२७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ** सिंदखेडराजा तालुकासिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण २२७८ विद्यार्थी परिक्षेला बसले त्यापैकी २२४६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून, २१४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.५५ टक्के लागला.** लोणार तालुकालोणार : लोणार तालुक्यात एकूण २१७२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातील २१५२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर १८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून लोणार तालुक्याचा सरासरी निकाल ८८.0१ टक्के एव्हढा लागला आहे.** मोताळा तालुकामोताळा : मार्च २0१४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १७ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यात मोताळा तालुक्याचा निकाल एकूण निकाल ९0.८९ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुण पत्रिका २६ जून ला दुपारी तीन वाजे नतंर मिळणारआहेत.

** खामगाव तालुका 

खामगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च -२0१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीच्या परिक्षेचा निकाल आज मंगळवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळवर जाहीर करण्यात आला. यामध्ये खामगाव तालुक्याचा निकाल यावर्षी ८२ टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातून ९ शाळांचा निकाल १00 टक्के लागला असून ग्रामीणमधून ६ तर शहरातील ३ शाळांचा समावेश आहे. तर सर्वात कमी निकाल ४५.५८ टक्के निकाल खामगाव येथील म्युनिसिपल हायस्कूल या शाळेचा लागला आहे.** नांदुरा तालुकानांदुरा : तालुक्यातील २५ शाळांचा वर्ग १0 वी चा निकाल लागला असून २६५0 पैकी २0८१ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ७८.६२ एवढी आहे. 

** संग्रामपूर तालुकासोनाळा : माध्यमिक शालांत १0 व्या वर्गाचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यामध्ये संग्रामपूर तालुक्याचा ८७.४४ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यात १ हजार ६४८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यामध्ये १ हजार ४४0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर २0७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तालुक्यात श्रीराम वानखडे विद्यालय वरवट खंडेराव या शाळेचा १00 टक्के निकाल लागला आहे. ** जळगाव तालुकाजळगाव जामोद : माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील तीन शाळांनी शंभर टक्के निकाल लावत तालुक्यात वेगळा सन्मान मिळवून दिला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत टक्केवारीत वाढ झाल्याने तालुक्याची गुणवत्ता वाढली आहे. यावर्षी तालुक्याचा निकाल ७८.५६ टक्के असून मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.