शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

युवकाने छेड काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:29 IST

जानेफळ: शाळेतून परतत असताना मैत्रिणीसमोर युवकाने छेड काढल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या ...

जानेफळ: शाळेतून परतत असताना मैत्रिणीसमोर युवकाने छेड काढल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मेहकर तालुक्याील वडाळी येथे गुरूवारी (ता. ३० जानेवारी) घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकास अटक केली असून न्यायालयाने त्याची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.या प्रकरणी संतप्त जमावाने मृत मुलीचा मृतदेह मध्यरात्री जानेफळ पोलिस ठाण्यात नेल्यानंतर  पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात दाखल केलेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील कलमात वाढ करत बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतप्त जमाव शांत झाला.वडाळी येथील एक अल्पवयीन मुलगी ही चिखली तालुक्यातील उंद्री येथील एका शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. दररोज गावावरून ती शाळेत बसद्वारे ये-जा करत होती. ३० जानेवारी रोजी सराव परीक्षा देण्यासाठी ती मुलगी गेली होती. परीक्षा दिल्यानंतर गावी परत येण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास ती उंद्री बसस्थानकावर मैत्रिणीसह थांबली होती. त्यावेळी आरोपी महादेव सीताराम देवकर (२२, रा. वडाळी) याने तिला दुचाकीवर चल मी सोडून देतो असे म्हणत छेड काढली होती. ही बाब मैत्रिणीसमोर अपमान झाल्यासारखी वाटल्याने घरी पोहोचताच अल्पवयीन मुलीने तिच्या आजोबांना सांगितली. त्याचा जाब विचारण्यास तिचे आजोबा आरोपीकडे गेले असता अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेतला. आजोबा परत आले असता घराचा दरवाजा बंद दिसला व अल्पवयीन मुलीने कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला असता अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील नागरिक मदतीला धावले होते आणि अल्पवयीन मुलीस उंद्री येथील रुग्णालय व तेथून चिखली येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तेथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वडाळी येथे नेण्यात आले. प्रकरणी पोलिसांनी प्रथमत: आरोपी महादेव सीताराम देवकर (२२) याच्या विरोधात अल्पवयीन मुली आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मृतदेह ठेवला पोलिस ठाण्यातया घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन झालेले पार्थिवच पोलिस ठाण्यात नेत रोष व्यक्त केला. सोबतच प्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे ठाणेदार दिलीप मसराम यांनी वरिष्ठांशी चर्चा करून मृत मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेत या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अ‍ॅक्ट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर जमाव शांत झाला. रात्री उशिरा वडाळी येथे त्या मृत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपीस अटकघटनेचे गांभिर्य पाहता पोलिसांनी महादेव सीताराम देवकर (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. ३१ जानेवारी रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास मेहकरचे प्रभारी एसडीपीओ प्रदीप पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या