गेल्या एक वर्षापासून अवघे जग कोरोनाशी सामना करत आहे. त्यातून मेहकर तालुकाही सुटला नाही. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संशोधकांनी अथक परिश्रमानंतर कोविड प्रतिबंधक लस संशोधित केली आहे. त्यामुळे तालुक्यातील घाटबोरीसारख्या ग्रामीण आदिवासीबहुल गावात कोविडचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने तालुका महसूल विभाग व आरोग्य विभागाअंतर्गत कोविडशिल्ड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. शासकीय आश्रमशाळेत पहिल्या टप्प्यात महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवून अगोदर रॅपिड टेस्ट व नंतर लस टोचून घेतली. यावेळी ग्रामविकास अधिकारी शंकर साखरकर, महसुल मंडल अधिकारी गजानन ढोके, तलाठी संजय शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल मगर, डॉ रवींद्र साठे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात आलेली लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असून, कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करुन घ्यावे. तोंडावर मास्क बांधून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत लस घ्यावी, असे आवाहन केले.
घाटबोरीत आरोग्य विभागाची लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:36 IST