शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घाटाखाली ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:31 IST

खामगाव: जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा असलेल्या खामगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, १६ पैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पडली असून, एका सरपंचासह ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोध विजयी झाले आहेत.  राज्याचे  कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या ना. भाऊसाहेब फुंडकर यांची होमपीच असलेल्या खामगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देमतदार प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्जमतदान केंद्राच्या सज्जतेसह विविध उपाययोजना

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा असलेल्या खामगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, १६ पैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पडली असून, एका सरपंचासह ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोध विजयी झाले आहेत.  राज्याचे  कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या ना. भाऊसाहेब फुंडकर यांची होमपीच असलेल्या खामगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची ‘ट्रायल’ म्हणून  ग्रामपंचायतीवर दबदबा कायम ठेवण्यासाठी, भारतीय जनता पक्षासह प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही सरसावला आहे. तथापि, कोंटी येथे भाजपने खाते उघडले असून, निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी काट्याच्या लढती होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, तालुक्यातील दिवठाणा येथे ४ सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. तर खुटपुरी येथे ७, वडजी-0२, कवडगाव-0२,  किन्ही महादेव-0३, जळका तेली-0२, नागापूर-0२, सजनपुरी-0२, माक्ता-0३, लोणी गुरव-0५, नायदेवी-0४, वझर-0२, झोडगा-0४ तर कोंटी येथील 0६ सदस्य पदाच्या जागाचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात सरपंच पदाच्या १५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्य पदाच्या १२६ जागांसाठी १५३ उमेदवार रिंगणात आहेत.  या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४३ उमेदवारांनी माघार घेतली असून, सदस्य पदाचय ४७ उमेदवारांनी माघार घेतली आहे.  निवडणुकीसाठी ५0 मतदान केंद्र सज्ज करण्यात आले असून, २२४ कर्मचारी अधिकार्‍यांचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ६ निवडणूक निर्णय अधिकारी, ६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहा क्षेत्रीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या वाहतूक कामी ५ बसेस आणि १0 खासगी चारचाकी वाहने लावण्यात आली आहेत. 

खामगाव तालुक्यात ४८ सदस्य अविरोध! खामगाव तालुक्यातील दिवठाणा, खुटपुरी, वडजी, कवडगांव, नांद्री, किन्ही महादेव, जळका तेली, नागापूर, सजनपुरी, माक्ता, लोणी गुरव, लोखंडा, नायदेवी, वझर, झोडगा, कोंटी येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, कोंटी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक अविरोध पार पडली. तर  ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोधत निवडून आले आहेत. या सदस्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक असून उर्वरित जागांवर निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने तयारी चालविली आहे. या निवडणुकीसाठी मतदान यंत्रे सील करण्यात आले.