शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST

बुलडाणा : काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्या नागरिकांना युनिव्हर्सल ई-पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे, हवाई ...

बुलडाणा : काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्या नागरिकांना युनिव्हर्सल ई-पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे, हवाई प्रवासासह माॅल प्रवेशासाठी घरबसल्याही पास मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने विविध निर्बंध शिथिल केले आहेत. यामध्ये काेराेनाचे दाेन्ही डाेस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे, हवाई प्रवासासह माॅलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी युनिव्हर्सल ई-पास नागरिकांना ऑनलाइन देण्यात येत आहेत. त्यामुळे, नागरिकांना दिलासा मिळाला आहे़

काेराेनाचे निर्बंध शिथिल करतानाच राज्य शासनाने लसीचे दाेन्ही डाेस घेणे अनिवार्य केले आहे़ त्यामुळे, युनिव्हर्सल ई-पासवर पहिला आणि दुसरा डाेस कधी घेतला याची तारीख येते़ तसेच त्यावर फाेटाेही टाकता येताे़ या पाससाठी कुठेही ऑफलाइन अर्ज करण्याची गरज नाही़ हा पास जनरेट हाेत असल्याने सर्वसामान्यांचा त्रास वाचला आहे़

असा मिळवा ई-पास

- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.

- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.

-त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एक वेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.

- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.

- त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

- त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.

- या तपशिलामध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाइल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाइल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.

- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.

- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.

काेट

काेराेनाचे दाेन्ही डाेस घेतलेल्या नागरिकांसाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ लस घेताना जाे माेबाइल क्रमांक दिला आहे ताे माेबाइल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी येताे़ ताे ओटीपी टाकल्यानंतर युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास जनरेट हाेताे़

भूषण अहिरे, उपजिल्हाधिकारी, बुलडाणा