शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मोफत स्वस्त धान्य मिळणार; एक अफवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:56 AM

असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबाना रेशन दुकानावरून धान्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना एक फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करणारा एक संदेश आणि फॉर्मचा नमुना समाज माध्यमावर फिरत होता. परंतू मोफत स्वस्त धान्य मिळणार असल्याची अफवास असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. बनावट फॉर्म व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघन इत्यादी जेवनाअभावी हाल होऊ नये, लोकांना रेशन पासून वंचित राहावे लागू नये, यासाठी काही लोकांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबाना रेशन दुकानावरून मोफत धान्य मिळणार असल्याचा संदेश सोशल मिडीयावरून व्हायरल केला आहे.धान्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना एक फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करणारा एक फॉर्मचा नमुना समाज माध्यमावर काही दिवसांपासून फिरताना दिसून येत आहे. हा फॉर्म भरून दिल्यास ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांनाही रेशन दुकानावर धान्य मिळेल, असा दावा केला गेला. परंतू असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, किंवा असा कोणताही फॉर्म काढलेला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खांदारे यांनी केले आहे. रेशनवरील धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड असणे ही प्राथमिक अट आहे. हे कार्ड नसेल तर धान्य मिळणार नाही, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

मोफत धान्य वाटप होणार असल्याची अफवा आहे. असा कुठलाच निर्णय विभागाने घेतला नाही. मोफत धान्य देण्यात संदर्भात काढण्यात आलेला फॉर्म बनावट आहे.-गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा