शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जेनेरिक मॉलचा उपक्रम राज्यभर पोहोचविणार!

By admin | Updated: January 6, 2017 02:29 IST

मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन: सिद्धविनायक जेनेरिक मॉलचे उद्घाटन.

चिखली, दि. ५- आपल्या तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा हाकताना महागड्या औषधोपचारामुळे आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणार्‍यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. अशा लोकांना नवसंजीवनी ठरावी व त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या हेतूने आ.राहुल बोंद्रे यांनी बाजारात सर्वाधिक स्वस्त मात्र गुणवत्तेच्या बाबतीत किंचतीही कमी नसलेली जेनेरिक औषध या भागात जनतेला उपलब्ध करून देण्याचे काम सिद्धविनायक मेडिकल मॉल व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून केले आहे. त्यांच्या या कार्याने आपण प्रभावित झालो असून, आज प्राथमिक स्तरावर त्यांनी उभा केलेला हा प्रकल्प व त्यांचे परिणाम पाहता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प संपूर्ण राज्यभर राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले.स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी संचालीत सिद्धविनायक मेडिकल मॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश छाजेड तर प्रमुख उपस्थितांमध्ये बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, चिखली मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र गुप्ता, इंडियन मेडिकल असो. चे डॉ. अजाबराव वसु, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, आमदार राहुल बोंद्रे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.व्ही. आर. यादव, जनुभाऊ बोंद्रे, बाबूराव पाटील, हिरकणी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक वृषाली बोंद्रे, आत्माराम देशमाने, सिद्धेश्‍वर वानेरे, अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे व प्राचार्य डॉ.अरुण नन्हई, प्राचार्य डॉ. भांबेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार राहुल बोंद्रे यांनी जेनेरिक मेडिकल मॉल व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी दिलेल्या रुग्णसेवेच्या विचाराने प्रेरित होऊन हा समाजसेवेचा उपक्रम आम्ही हाती घेतला असून, या मॉलला भेट देणारे समाजातील गोरगरीब, कष्टकरी, जनसामान्यांसाठी याठिकाणी उच्चप्रतिची; परंतु स्वस्त औषध देण्याबरोबरच रुग्णांना समुपदेशन करण्याचे कामही आमच्या अनुराधा फार्मसीची चमू करणार असल्याचे स्पष्ट केले, तर अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुरेश छाजेड यांनी जेनेरिक औषधाचे महत्त्व व जनसामान्याच्या जीवनातील त्याची आवश्यकता, याविषयी माहिती देऊन बुलडाणा जिल्हय़ात प्रथमच जेनेरिक मेडिकल मॉलबरोबरच समुपदेशन केंद्र सुरु करणारे या उपक्रमाचे कौतुक करुन हे चागंले कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रसंगी राधेश्याम चांडक, राजेंद्र काळे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्तविक प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांनी केले. यावेळी डॉ. बेदमुथा, काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, कैलास खंदारे, अतहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, पं.स.सभापती लक्ष्मणराव अंभोरे, उपसभापती दयानंद खरात, जि.प.सदस्य अशोक पडघान, पीरिपाचे भाई विजय गवई, जितेंद्र बोंद्रे, नगरसेवक अ.रफीक, अ.रउफ, सुनील कासारे, प्रदीप पचेरवाल, सचिन बोंद्रे, दीपक खरात, दीपक देशमाने, बिंदुसिंग इंगळे, डॉ. गुलाबराव सपकाळ यांची उपस्थिती होती. संचालन करून आभार प्रा. उन्मेश जोशी व गणेशकर यांनी मानले.