शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयाला रिक्त पदांचा आजार

By admin | Updated: October 29, 2014 23:50 IST

खामगाव सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिका-यांची १९ पदे रिक्त.

खामगाव : घाटाखाली जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या खामगाव येथील सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत इतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे वाढत असल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. सामान्य रुग्णालयालाच रिक्त पदाचा आजार असल्याचे दिसून येत आहे.खामगाव येथील सामान्य रुग्णालय २२0 खाटांचे आहे. दररोज येथील बाह्य रुग्ण विभागात ४00 पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांच्या सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ ची १६ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी पाच डॉक्टर सध्या कार्यरत आहेत, तर शल्यचिकीत्सक हे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. वैद्यकीय अधीक्षक, बालरोगतज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ असे चार डॉक्टर कामकाज पाहत आहेत, तर वर्ग दोनची २0 पदे मंजूर असून, आठ पदे रिक्त आहेत. १२ डॉक्टर कार्यरत असले तरी यापैकी एक डॉक्टर मागील फेब्रुवारीपासून गैरहजर आहेत, तर दुसरे डॉक्टर उच्चशिक्षणासाठी गेले आहेत. परिणामी १0 डॉक्टर कार्यरत आहेत. वर्ग तीनची १३१ पदे मंजूर असताना १0९ कार्यरत असून, २२ पदे रिक्त आहेत. वर्ग चारची ५७ पदे मंजूर असून, यापैकी नऊ पदे रिक्त असल्याने ४८ कर्मचारी कामकाज करीत आहेत. येथील सामान्य रूग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू), नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एसएनसीयू), डायलिसीस युनिट, जळीत कक्ष कार्यान्वित आहे. २४ तास अपघात कक्ष (ट्रामा केअर युनिट) येथे आहे. प्रसूतीसाठी येणार्‍या स्त्री रुग्णांची संख्या वाढती आहे. मात्र, याकरिता केवळ एकच स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. स्त्रीरुग्णांची वाढती संख्या पाहता सोनोग्राफी मशीन कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मात्र, मागील कित्येक महिन्यापासून सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत धूळखात पडलेली आहे.