शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची विल्हेवाट नळगंगेत!

By admin | Updated: May 16, 2017 01:04 IST

मलकापूर : मलकापूर येथे दिवसाकाठी शेकडो टन घाण व केरकचऱ्याची तथा खाजगी बांधकामांच्या मलब्याची नदीत विल्हेवाट लावली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : मलकापूर येथे दिवसाकाठी शेकडो टन घाण व केरकचऱ्याची तथा खाजगी बांधकामांच्या मलब्याची नदीत विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे नळगंगा मायीच्या पात्राचे अक्षरश: डंम्पींग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे नदी काठच्या हजारो नागरीकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शासन नदी खोलीकरणासाठी लाखो रूपये खर्च करत असताना इथे मात्र घाणीमुळे नदी भरणाचा कार्यक्रम सुरू असून प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी पावसाळ्यापुर्वीची तयारी म्हणून पालिका अखत्यारीत नाल्यांची साफसफाई सुरू आहे. त्यातल्या त्यात शहरात खाजगी बांधकामांची भाऊगर्दी वाढलीय हयात निघणारा केरकचरा व मलबा शेकडो टन स्वरूपात असून त्याची विल्हेवाट नगर पालिकेच्या अधिकृत ‘डंम्पींग’ ग्राऊंडमध्ये न होता नळगंगा नदीच्या पात्रात लावली जात आहे.मलकापूर शहरातून नळगंगा मायीची वाटचाल पुढे पुर्णामायीच्या पात्राकडे झालेली आहे. त्याच नळगंगा पात्राचे, काशीपुरा, सालीपुरा, बारादरी, किल्लावार्ड, मोहनपुरा, पारपेठ अशा नदीलगतच्या परिसरात अक्षरश: डम्पींग ग्राऊंड झाल्याचे विदारक चित्र आहे. त्यातल्या वैकुंठधाम स्मशानभुमी परिसरात त्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची अक्षरशा ‘हाईट’ झाल्याचे दिसते. नळगंगा मायीचे पात्र घाण व केरकचरा तथा मलब्यानंतर दिवसेंदिवस भरत चालल्याने मलकापुरात रोगराईची शक्यता निर्माण झाली आहे. साथीच्या रोगांना त्यात खुलेआम निमंत्रण दिल्या जात असून नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरीकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन मुग गिळून असल्याचे दिसते. एकीकडे नदी खोली करणासाठी शासनाच्यावतीने दरवर्षी लाखो रूपये खर्च केल्या जातात इथे मात्र शहरातील घाण, केरकचरा व बांधकामांचा मलबा आदिंनी नदीपात्र भरण्याचा कार्यक्रम दिवसाढवळ्या सुरू आहे. पालिका प्रशासनाने त्याविषयी कानावर हात ठेवले आहे. प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्रात घाण करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याविरूध्द कोण कारवाई करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. आपल्याला काय बिलं निघाली की झालं!नळगंगा नदी असो किंवा दुसरं काही आपण बघत राहायचं. शहरातला कचरा, घाण किंवा बांधकामाचा मलबा टाकून एकदा का नदीपात्र भरले की मग खोलीकरणाच्या नावाखाली त्याची बिल काढायची... कामं होवो अथवा ना होवो आपल्याला काय बिल निघालं की झालं असा पालिका अखत्यारीत काम करणाऱ्या काही ठेकेदारांचा खाक्याच बनला आहे.शहरातली घाण व कचरा नदीपात्रात टाकण्याविषयी आमचे कसलेच आदेश किंवा सूचना नाहीत. तसं होत असेल तर ती चुकीची बाब आहे. नागरीकांनी तसे करणाऱ्यांची माहिती द्यावी. त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई प्रशासनाच्यावतीने करण्यात येईल.- श्रीनिवास कुरे,मुख्याधिकारी न.प. मलकापूर