शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाची अखंड परंपरा गोसावीनंदन गणपती

By admin | Updated: September 2, 2014 00:54 IST

राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणार्‍या मातृतिर्थ सिंदखेडराजा या ठिकाणी सुमारे ३५0 वर्षापूर्वी श्री संत गोसावीनंदन यांनी स्थापन केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे.

सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणार्‍या मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीला ऐतिहासिक सोबतच धार्मिक, अध्यात्मीक परंपरेचा वारसा लाभलेला असून, या ठिकाणी सुमारे ३५0 वर्षापूर्वी श्री संत गोसावीनंदन यांनी स्थापन केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे. या मंदिराचे २ कोटी रुपयांचे बांधकाम करण्यात येत आहे. नेत्री दान हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजरे, माया शेंदुर पाझरे, वरोवरी दुवांकराचे तुरे. या स्तवनाचे रचिते संत गोसावीनंदन यांच्या महतीचा अध्यात्मीक वारसा मातृतिर्थ नगरीला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असणारे येथील संतवर्य गोसावीनंदन स्वामी यांचे पूर्वज मराठवाड्यातील बिड (गंगातीर) येथील राहणार असून, गोसावीनंदन स्वामींनी श्रीक्षेत्र मोरगाव येथील तपश्‍चर्या केल्यावर त्यांना साक्षात गणपतीने दर्शन देऊन सिद्धक्षेत्र सिंदखेडराजा येथे जाण्याची आज्ञा केली, अशी अख्यायिका आहे. गोसावीनंदन यांचे चरित्र अभंगावरुन ते प्रत्यक्षात श्री गणेशाचेच अवतार होते असे, ह्यम्हणे आव मोठा देखिला गोमटा, आता तुझे पोटा शिघ्र येते, जगाचा उद्धार व्हावया अवतार स्वयं गणेश्‍वर घेई ऐसी.ह्ण या ओवीवरुन सिद्ध होते. येथील त्यांच्या वास्तव्य काळामध्ये श्री गोसावीनंदन यांनी रचलेली अनेक गणेशस्तवन, आरत्या, देवीचे पदे, कवणे प्रचलीत असून त्यांचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. गोसावीनंदन यांनी ३५0 वर्षापूर्वी सुरु केलेला गणेशोत्सव आजही त्याच श्रद्धेने मातृतिर्थ नगरीत साजरा होतो. काळ्या मातीपासून पर्यावरण पुरक उत्सव मुर्ती दरवर्षी स्थानिक शिल्पकार तयार करतात. या मुर्तीची प्रतिष्ठापणा करुन गणेशोत्सव साजरा केला जातो.