शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पैशांचा पाऊस पाडणारी सात जणांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:15 IST

किनगावराजा(बुलडाणा) :  वनस्पती औषधाच्या साहाय्याने  पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या पैशांचे चौपट पैसे करून  देणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या केशवशिवनी शिवारातील शेतात २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पकडले. यावेळी टोळीतील  एकूण  सात आरोपींना अटक करण्यात आली असून,  एक लाखाच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपींकडून एक लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा(बुलडाणा) :  वनस्पती औषधाच्या साहाय्याने  पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या पैशांचे चौपट पैसे करून  देणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या केशवशिवनी शिवारातील शेतात २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पकडले. यावेळी टोळीतील  एकूण  सात आरोपींना अटक करण्यात आली असून,  एक लाखाच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या दुसरबीड-केशवशिवनी रस्त्यावरील केशवशिवनी शिवारातील एका शेतात पैशांचा पाऊस पाडणारी टोळी येणार असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोरे यांच्या नेतृत्वात पोलीस हेडकॉन्स्टेबल चांदुरकर, पोलीस नाईक विजय काकड, सानप आदींनी सापळा रचला. यावेळी विजय हरी पाटील रा. खेर्डा ता. रावेर जिल्हा जळगाव खान्देश यांच्याकडून २५ हजार घेऊन पैशांचा पाऊस पाडून चौपट एक लाख रुपये करून देतो म्हणून आरोपी शे.सत्तार शे.जब्बार रा. किन्होळा ता. चिखली, तालिफ  गब्बार अहमद रा. चिखली, युनूस नादर पठाण खान रा.दुसरबीड, विजय तुकाराम गायकवाड रा. पलढग ता. मोताळा,  तुळशीराम बालू चव्हाण रा. मोहेगाव ता. मोताळा, माधव ओंकार चव्हाण ता. मोताळा व सुरेश नथ्थू मराठे रा. बालवाडी. ता. रावेर जिल्हा जळगाव यांनी संगनमत करून एक लाख रुपयांचे २००० व ५०० रुपयांच्या नकली नोटांचे बंडल दिले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना रंगेहात पकडून एक लाख रुपयांच्या नकली नोटांचे बंडल जप्त केले. याप्रकरणी विजय हरी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध किनगावराजा पोलीस स्टेशनला भादंवि ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेवाळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत.    

स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे आरोपी जाळ्यात या प्रकरणातील फिर्यादी विजय हरी पाटील यांनी त्यांच्या बालपणीचा मित्र सुरेश नथ्थू मराठे याने बुलडाणा जिल्ह्यातील एक व्यक्ती वनस्पती औषधीच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून रक्कम चारपट करून देत असल्याचे आमिष दाखविले. त्यामुळे विजय पाटील यांनी सोबत २५ हजारांची रक्कम सोबत घेऊन पैसे चौपट करून देणा-या शेख सत्तार शेख जब्बार याला भेटले. यावेळी त्याने विजय पाटील यांच्याकडून २५ हजार रुपये घेऊन मंत्रतंत्र व पूजापाठाच्या साहाय्याने याचे एक लाख रुपये करण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर विजय पाटील यांना एक थैली दिली. सदर थैलीत एक लाख रुपये असल्याचे सांगून ही घरी गेल्यावरच उघडायची, असे त्यांना सांगितले; मात्र आपली फसवणूक झाल्याचे विजय पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून रस्त्याने जात असलेल्या एका गाडीतील लोकांना थांबवून घडलेला प्रकार सांगितला. सदर गाडी स्थानिक गुन्हे शाखेची असल्यामुळे त्यांनी त्वरित किनगावराजा पोलिसांच्या साहाय्याने सापळा रचून घटनास्थळ गाठून सर्वच आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेल्या तत्परतेमुळे पैशांचा पाऊस पाडणाºया टोळीस पकडण्यात यश आले आहे. 

टॅग्स :buldhana city police stationबुलढाणा शहर पोलिस ठाणेbuldhanaबुलडाणा