शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून अवैध दारु आणणारी टोळी गजाआड

By admin | Updated: August 11, 2014 00:03 IST

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विदेशी दारु विकण्याचा गोरखधंदा

खामगाव : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विदेशी दारु विकण्याचा गोरखधंदा करणार्‍या टोळीला काल जळगाव जामोद- पिंपळगाव काळे रस्त्यावर रंगेहात पकडून त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोउपनि नरेंद्र मावळे यांना मध्यप्रदेशातून जिल्ह्यात विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. मावळे यांनी जळगाव जामोद- पिंपळगाव काळे रस्त्यावर सापळा रचला असता पिंपळगाव काळे येथील पावर हाऊस समोरुन इंडिका क्रमांक एमएच ३0 पी २८९९ मध्ये विदेशी दारु घेऊन जाताना रंगेहात पकडले. इंडिका कारमध्ये २४ हजार २८ रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. तसेच इंडीका कार असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी परमानंद ताराचंद भुजवाणी वय ५५, लालाधर साहेबराव पाटील वय ३४, राकेशकुमार चंद्रकुमार अडवाणी २५, आकाश अशोककुमार नवलाणी २१ सर्व रा. बर्‍हाणपूर यांच्या विरुद्ध कलम ६५ (क) (ड) ८३, १0८ भादंविन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता उपरोक्त चारही जणांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावलीे. कारवाईत पोउपनि नरेंद्र मावळे, पोकाँ. सोळंके, देशमुख, जाधव, एडसकर आदींनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी) प्रवाशांची एसटीवर झुंबड निमित्त रक्षाबंधनचे : आगाराकडून जादा बसफेर्‍यांचे नियोजन खामगाव: बहिण-भावाच्या नात्याची महती पटविणार्‍या रक्षाबंधन सणानिमित्त आज एसटी तसेच इतर प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर प्रवाशांची चांगलीच गर्दी होती. सकाळपासून शहरातून इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची चांगलीच धावपळ दिसून आली. खामगाव शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथून दररोज प्रवाशांची गर्दी असते. मात्र, आज रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांच्या संख्येत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढ झाली होती. भावाला राखी बांधण्यासाठी अनेक बहिणींची माहेरकडे धाव होती. त्याचप्रमाणे काही भावांचीही बहिणींकडे जाण्यासाठी ओढ असल्याने बस स्थानकावर आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. बस स्थानकावरील गर्दीचा ओघ लक्षात घेता काहींनी खासगी प्रवासी वाहतुकीला पसंती दिली. त्यामुळे एसटी सोबतच इतर खासगी प्रवासी वाहतुकीवरही प्रवाशांची चांगलीच गर्दी दिसून आली. वाढत्या गर्दीमुळे महामंडळासोबतच खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या काळीपिवळी, ऑटो आदी व्यावसायिकांना चांगल्यापैकी उत्पन्न मिळाले. तसेच प्रवाश्यांनाही प्रवासासाठी सुविधा झाली होती.