शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शांतता समितीने घेतली गणेश मंडळे दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:36 IST

डोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २८ गणपती बसले असून, ५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ मांडण्यात आले आहेत. तर डोणगावमध्ये १४ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २८ गणपती बसले असून, ५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ मांडण्यात आले आहेत. तर डोणगावमध्ये १४ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.नुकतीच डोणगाव शांतता समितीची बैठक संपन्न झाली व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी म्हणून वेगवेगळे उपक्रमावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गणेश मंडळांना प्रोत्साहन व सहकार्य मिळून शांतता प्रस्थापित होण्यासाठी ठाणेदार आकाश शिंदे व पीएसआय विलास मुंढे यांनी डोणगाव गणेश मंडळ दत्तक योजना ही संकल्पना गणेशमंडळ व शांतता समिती यांच्यासमोर ठेवली. यामध्ये प्रत्येक गणेश मंडळ अध्यक्ष व शांतता समिती सदस्यांसह एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड यांना एक गणेश मंडळ दत्तक देण्यात आले. ज्या गणेश मंडळाला जो शांतता समिती सदस्य दत्तक घेईल त्यांच्याकडे सर्व त्या गणेश मंडळाला भेट देणे व मार्गदर्शन करणे व शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य देण्यात आले. जे गणेश मंडळ दहाही दिवस राष्ट्रीय हिताचे व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून वेगवेगळे संदेश जनतेपर्यंत पोहचवेल व शांतता प्रस्तापित करून विसर्जन करेल अशा सर्व गणेश मंडळ अध्यक्ष व शांतता समिती सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर योजना जिल्हय़ात प्रथमच डोणगाव पोलीस स्टेशनने सुरू केल्याने गणेश मंडळाचे वेगवेगळे उपक्रम पाहावयास मिळत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी डोणगावचे ठाणेदार प्रत्येक गणेश मंडळाला शांतता समितीच्या सदस्यांसह भेट देत असल्याने या आगळ्यावेगळ्या डोणगाव गणेश मंडळ दत्तक योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.