शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात सिंदखेड ग्रामीण भारताच्या विकासाची दिशा ठरवेल : राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

धामणगाव बढे : भविष्यातील कोरोनाचा धोका ओळखून सुमारे एक वर्षापूर्वी गावामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून गावकऱ्यांचे ...

धामणगाव बढे : भविष्यातील कोरोनाचा धोका ओळखून सुमारे एक वर्षापूर्वी गावामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून गावकऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यात यशस्वी ठरलेल्या, गावकऱ्यांच्या एकजुटीतून विकासाची चळवळ राबणारे सिंदखेड गाव भविष्यात ग्रामीण भारताच्या विकासाची दिशा ठरवेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले.

मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात सिंदखेड या छोट्याशा गावाने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनातून मागील काही वर्षांत गावाचा केलेला कायापालट हा प्रेरणादायी आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप फाउंडेशनच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा खडतर प्रवास हा गावाच्या एकजुटीचे प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रवीण कदम, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची मागणी केली हाेती व गडकरी यांनी तत्काळ मान्यदेखील केली.

या प्राप्त झालेल्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे औपचारिक उद्घाटन राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य ॲड. गणेशसिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.