शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

By admin | Updated: September 8, 2014 01:48 IST

अमडापूर गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

अमडापूर: अमडापूर गावासाठी १ कोटी २२ लक्ष रुपयांची नळयोजना कव्हळा धरणावरून कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र धरणात मुबलक साठा असतानाही नागरिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात असतानाही पाणी पट्टीचे बिल ३0 दिवसांचे वसूल केल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणारे पाणी अतिशय अशुद्ध आणि गढूळ आहे. पिण्यायोग्य पाणी दिल्या जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. सणासुदीच्या दिवसात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विहिरींमध्ये आता पावसाळा सुरू असल्याने ब्लिचिंग पावडर नियमित टाकल्यास विहिरीतील पाणी शुद्ध राहून आरोग्यास येत असलेला धोका टळू शकतो. याकरि ता ग्रा.पं.तीने लक्ष देण्याची गरज असून, राजकारणाकडे थोडे लक्ष कमी करून गावकर्‍यांची पाणी समस्या सोडवावी, अशी गावकर्‍यांची रास्त मागणी आहे.आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावामध्ये ताप, थंडी, सर्दी, खोकला अशा आजारांची साथ सुरू असून, गावातील नाल्या, रस्त्यावर खड्डय़ामध्ये थांबलेले पावसाचे पाणी व होत असलेल्या घाणीवर ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी. तसेच आता गणपतीचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठीसुद्धा ग्रामपंचायतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ावर उपाययोजना करावी. गणपती मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडीअडचण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.