सुंदरखेड येथे पाच पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यातील सुंदरखेड येथे पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. सुंदरखेड येथे दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दंडात्मक कारवाईने वाहनचालकांचा गोंधळ
लोणार : मंठा नाक्यावर पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईने वाहनचालकांचा चांगलाच गोंधळ उडाला. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु अनेकजण विनामास्क बाहेर पडत आहेत. काही लोक काम नसतानाही विनाकारण वाहनाने फिरत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लोणार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शनिवारी २० जणांवर कारवाई केल्यानंतर रविवारीही अनेक वाहनचालकांना पकडण्यात आले. या कारवाईच्या भीतीने रविवावारी रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
पाण्याच्या शोधात माकडे पाण्याच्या टाकीकडे
लोणार : उन्हाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. माकडांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे ते येथील पाणीपुरवठा पाण्याच्या टाकीकडे धाव घेताना दिसत आहे. मिळेल तसे पाणी पिऊन तहान भागवित आहेत.
विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर ‘वॉच’
बीबी : संचारबंदी असताना नाहक रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांचा वॉच आहे. वाहनचालकांची चौकशी करैन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. बीबी पोलिसांनी दोन दिवसांत अनेक वाहनधारकांवर कारवाई केली आहे.
उकाड्याने नागरिक त्रस्त !
किनगाव राजा : वातावरणातील उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून अनेकांनी शेतात ठाण मांडले आहे. संचाबंदी असल्याने घराबाहेर बसता येत नाही.
सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करण्याची गरज
मेहकर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतूु त्यांना पाहजे तशा सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे.
बुलडाण्यात धूरफवारणी
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात नगर पालिकेकडून जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. २३ एप्रिल रोजी येथील बसस्थानकच्या मागील बाजूस व जांभरून रोड परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.
रोजगार नसल्याने पुन्हा मजूर गावाकडे
दुसरबीड : कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने शहरी भागातील व्यवसाय बंद झाले आहेत. पोट भरण्याचे साधन नसल्यामुळे मजुराचे लोंढे पुन्हा खेड्याकडे निघाले आहेत. दुसरबीड परिसरात अनेक मजूर वर्ग औरंगाबादवरून गावाकडे परत आला आहे. मागील वर्षीसुद्धा हे मजूर गावाकडे आले होते.
कोरोनाबाबत जनजागृती
बुलडाणा : कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर संचारबंदी लागू आहे. पोलीसांकडून कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून जनजागृती केली. सोबतच शासन व प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणू व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.
सर्जिकल ग्लोव्हचे भाव वाढले
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सर्जिकल ग्लोव्हज २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री केले जात होते. त्याचे दर आता साधारणत: ८० रुपयांपेक्षाही अधिक आहेत. पूर्वी सर्जिकल ग्लोव्हज वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. आता त्यांची मागणी वाढली आहे.