शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:51 IST

नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला ‘चंद्रकांत भाकरे अमर रहे.. ! च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला.

ठळक मुद्दे चंद्रकांत भाकरे यांच्यासह तिघे जवान काश्मिरमधील दहशतवाद्यांशी लढतांना शहिद झाले होते.२० एप्रिलरोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागरिकांनी आपल्या अंगणातून, गच्चीवरून आपल्या लाडक्या जवानावर पृष्टवृष्टी करीत अखेरचे दर्शन घेतले.

पातुर्डा ता. संग्रामपूर: काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले येथील सिआरपीएफ जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात २० एप्रिलरोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग पाळत  उपस्थित नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला ‘चंद्रकांत भाकरे अमर रहे.. ! च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला.  १८ एप्रिलरोजी चंद्रकांत भाकरे यांच्यासह तिघे जवान काश्मिरमधील दहशतवाद्यांशी लढतांना शहिद झाले होते. २० एप्रिलरोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता पातुर्डा येथे गावातून मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम पोलिसांची व्हॅन यानंतर फुलांनी सजवलेल्या रथात शहिद जवान चंद्रकांतचे पार्थीव,यानंतर पुन्हा मागे सॅनिटायझेशन स्प्रे व सुरक्षा व्हॅन. यानंतर पाच पावले चालणारे नागरिक अशाप्रकारे आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपल्या अंगणातून, गच्चीवरून आपल्या लाडक्या जवानावर पृष्टवृष्टी करीत अखेरचे दर्शन घेतले. पातूर्डा ग्रामपंचायतने तीन क्विंटल फुलांच्या पाकळ््या घरोघरी पोहचवल्या होत्या. घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही त्यास प्रतिसाद दिला. पातुर्डा फाट्यालगत भूषण रोठे यांच्या शेतात शहिद जवान चंद्रकांतच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासन, प्रशासन, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पोलिस,  महसूल प्रशासन व पंचायत राज प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMartyrशहीद