शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

गावांना स्वावलंबी करण्यासाठी निधी देणार-फुंडकर

By admin | Updated: April 25, 2017 00:21 IST

मेहकर तालुक्यातील पांगरखेड ग्रामपंचायत प्रथम : मोताळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

बुलडाणा : गावांना स्वच्छतेबरोबरच पाणीपुरवठा, रस्ते व आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून काम करीत आहे. गावांना स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी शासनाने हगणदरीमुक्तीचा संकल्प जाहीर केला आहे. मार्च २०१८ पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदरीमुक्त करावयाचा आहे. यासोबतच गावांना स्वावलंबी बनवायचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य शासन छोटे-छोटे कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे गावे स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा हगणदरीमुक्त संकल्प सोहळा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार तसेच स्मार्ट व्हिलेज पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सहकार विद्या मंदिर विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार हर्षवर्धन सपकाळ, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प अध्यक्ष उमा तायडे, उपाध्यक्ष मंगला रायपुरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे सभापती श्वेता महाले, दिनकर देशमुख, डॉ. गोपाल गव्हाळे, राजेंद्र उमाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात प्रथम आलेली व स्मार्ट व्हीलेज स्पर्धेत स्मार्ट ठरलेल्या पांगरखेड गावाचा अन्य गावांनी आदर्श घेण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याने हगणदरीमुक्तीचे ६१ टक्के क्षेत्र व्यापले आहे. उर्वरित ३९ टक्के क्षेत्र हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी काम करावे. सरपंच, ग्रा.पं पदाधिकारी व ग्रामसेवकांनी गावाला स्वच्छ करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढवावा. जेणेकरून जिल्हा संपूर्ण हगणदरीमुक्त होईल.प्रास्ताविक दीपा मुधोळ यांनी केले. जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांनीही विचार व्यक्त केले. तसेच पांगरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे व जि.प मुकाअ दीपा मुधोळ यांची बदली झाल्यामुळे त्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पालकमंत्री यांच्या हस्ते पंचायत समिती स्तर व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातून आलेले सरपंच, पुरस्कारप्राप्त गावांचे पदाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आदींसह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी प्रशांत जोशी यांनी मार्गदर्शन केले. संचालन चंद्रशेखर जोशी यांनी, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजपूत यांनी मानले. स्मार्ट व्हीलेज स्पर्धेत पुरस्कारप्राप्त गावे अजिसपूर ता. बुलडाणा, मुंगसरी ता. चिखली, पांग्री ता. दे.राजा, भोसा ता. सिं.राजा, अंजनी खु ता. लोणार, पांगरखेड ता. मेहकर, पिंप्री कोरडे ता. खामगाव, येऊलखेड ता. शेगाव, सुलज ता. जळगाव जामोद, काकनवाडा खु ता. संग्रामपूर, धानोरा विटाळी ता. नांदुरा, दाभाडी ता. मोताळा व सिराढोण ता. मलकापूर.आएसओ प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायतीबुलडाणा तालुक्यातील अजिसपूर, सि.राजा तालुक्यातील भोसा, चांगेफळ त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींनी आयएसओ होण्यासाठी प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी नऊ गावे आयएसओ प्रमाणपत्र नामांकित झाली आहेत. त्यामध्ये चिंचपूर, दाभाडी, पिंप्री गवळी, माकोडी, शेलापूर, सिंदखेड, पसन्हेरा खेडी, तळणी व जहांगीरपूर ग्रामपंचायतींचा समावेश आहे.पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती पं.स., जिल्हा स्तरसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान जिल्हा स्तर पुरस्कार : प्रथम - पांगरखेड ता. मेहकर, द्वितीय अजिसपूर ता. बुलडाणा, तृतीय- संयुक्तरीत्या मोरखेड बु. ता. मलकापूर व मुंगसरी ता. चिखली. पंचायत समिती स्तर (प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे) : बुलडाणा- अजिसपूर, हतेडी खु व पळसखेड नागो, चिखली - मुंगसरी, मालगणी व टाकरखेड मुसलमान, दे.राजा- दगडवाडी, सावंगी टेकाळे व सुरा, सिं.राजा - भोसा, वसंतनगर व अडगाव राजा, लोणार- गोत्रा, भानापूर व हिवरा खंड, मेहकर -पांगरखेड, नागापूर व कल्याणा, खामगाव- पातोंडा, पिंप्री कोरडे व कौंटी, शेगाव - माटरगाव खुर्द, रोकडियानगर व आडसूळ, जळगाव जामोद- कुरणगड, पळसखेड व सुलज, संग्रामपूर- काकनवाडा खु., करमोडा व जस्तगाव, नांदुरा - धानोरा विटाळी, कोकलवाडी व वाडी बु., मोताळा- शेलगाव बाजार, जहांगीरपूर व टेंभी, मलकापूर - मोरखेड खु, निंबारी व शिराढोण. तसेच हगणदरीमुक्त पंचायत समितींचे पुरस्कार मलकापूर व शेगाव पंचायत समितीला देण्यात आले. स्मार्ट ग्रामपंचायतीचा ४० लाख रुपयांचा पुरस्कार पांगरखेड ता. मेहकर ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. विशेष पुरस्कारांमध्ये दगडवाडी ता. दे.राजा गावाला सामाजिक एकता पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर कुटुंबकल्याणचा विशेष पुरस्कार भोसा ता. सिं.राजा गावाला आणि पाणी व्यवस्थापन व गुणवत्तेचा विशेष पुरस्कार धानोरा विटाळी ता. नांदुरा गावाला प्रदान करण्यात आला.