शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे शेती मशागतीच्या दरात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST

हिवरा आश्रमः गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनता हैराण असताना आता पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना ...

हिवरा आश्रमः गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनता हैराण असताना आता पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्‍यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतात नांगरणी, वखरणी, पंची, रोटाव्हेटर इत्यादी कामे करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी बळीराजाचे शेती मशागतीचे गणित चांगलेच महागले आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेती मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देतात. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे यावर्षी नांगरणी, वखरणी या शेती मशागतीच्या कामासाठी अधिक दर मोजावे लागत आहेत. पूर्वी शेतकरी शेती मशागतीची कामे पशुधनाच्या मदतीने करत होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी नांगरणी, वखरणी, पेरणी इत्यादी कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने कामे करण्याला पसंती दर्शवितो. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसला तरी भाड्याच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची कामे केली जातात. मात्र, काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्‍याचा फटका शेती क्षेत्राला बसला. इंधनाचे दर गगनाला भिडले. त्‍यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, तर परतीच्या पावसामुळेसुध्दा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित डबघाईला आले आहे. आता मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे.

एका तासासाठी ७०० रुपये दर

शेती मशागतीच्या दरात वाढ

यापूर्वी नांगरणीसाठी एका तासासाठी ५०० रुपये दर होता. त्यासाठी आता ७०० रुपये मोजावे लागत आहेत. रोटाव्हेटरला यापूर्वी ८०० रुपये लागत होते. मात्र, इंधन दरवाढीमुळे रोटाव्हेटरसाठी आता १००० रुपये मोजावे लागतात. पंजीसाठी मागच्या वर्षी ५०० रुपये लागत होते. त्यासाठी आता ७०० रुपये मोजावे लागत आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे शेती मशागत, नांगरणी, वखरणी, पंजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, शेतमालाच्या भावात त्या प्रमाणात वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

अरूण गुलाबराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, दुधा.