शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

फळपिकांना मिळणार "विमा कवच"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना वर्ष २०२१-२२ करिता जाहीर करण्यात आली आहे. तसेच ...

बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना वर्ष २०२१-२२ करिता जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही योजना २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षांसाठी मृग बहारमध्ये लागू करण्यात आली आहे.

या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, सीताफळ, द्राक्ष, लिंबू व चिकू या आठ फळपिकांसाठी मिळणार आहे. तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, केळी आणि द्राक्ष या फळ पिकांकरिता लागू करण्यास १८ जून २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉबेरी व पपई या फळ पिकांकरिता प्रायोगिक तत्त्वावर योजनेचे विमाकवच मिळणार आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता, अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय देण्यात येते. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखले जाते.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. ही योजना या वर्षापासून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे.

चार हेक्टर क्षेत्र मर्यादा

या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे.

एकच फळपिकाची करता येणार निवड

एकच फळपीक निवडता येणार

अधिसूचित फळ पिकापैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.

महसूल मंडळ राहणार घटक

फळपीकनिहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसानभरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ राहणार आहे. या योजनेअंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून, ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी ५० : ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.