शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फळांच्या राजाला नववर्षाच्या महूर्तावर विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:23 IST

बुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.  

ठळक मुद्देआंब्यासाठी १.४७ लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई  नुकसान झाल्यास शेतकºयांना १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.  फळांचा राजा असलेला आंबा आता शेताच्या बांधावर कमी प्रमाणात दिसत आहे. बांधावरील आंब्याचे प्रमाण कमी झाल्याने वेगवेगळ्या जातीच्या आंब्याच्या फळबागा घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. या आंब्याच्या फळबागांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०१७-१८ लागू करण्यात आली आहे. कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकºयांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी सदर विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंबा या फळ पिकासाठी १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण राहणार आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१८ या कालावधीत अवेळी पावसाने नुकसान झाल्यास ३० हजार रुपये नुकसान भरापाई देय राहणार आहे. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत जास्त तापमानामुळे नुकसान झाल्यास २७ हजार ५०० रुपये, १ एप्रिल ते ३१ मे २०१८ या कालावधीत नुकसान झाल्यास १६ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देय राहणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान कमी तापमानामुळे नुकसान झाल्यास ३३ हजार रुपये व १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत गारपीटमुळे नुकसान झाल्यास ३६ हजार ७०० रुपये विमा संरक्षीत रक्कम देण्यात येईल. अशाप्रकारे एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये देय राहणार आहे. 

प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतबँकेकडून अधिसुचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या व बिगर कर्जदार शेतकºयांचा आंबा या फळ पिकाचा विमा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच आंबा या फळ पिकासाठी बँकानी कर्जदार शेतकºयांची घोषणा पत्र संबंधीत विमा कंपनीस १८ जानेवारी पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

आंबा फळासाठी तीन तालुकेच समाविष्टफळांचा राजा असलेल्या आंबा या महत्वाच्या फळ पीकाला विमा देण्यासाठी पश्चिम वºहाडातील केवळ तीन तालुक्यांचाच समावेश करण्यात आला आहे. सन २०१७-१८ मध्ये आंबिया बहाराकरीता पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्याकरिता अधिसूचित जिल्ह्यांमध्ये पश्चिम वºहाडातून  बुलडाणा व वाशिम हे दोन जिल्हे आंबा या फळ पीकामध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. तर वाशिम जिल्ह्यातून वशिम तालुक्यातील केकत उमरा व राजगाव आणि मानोरा तालुक्यातील मानोरा हे महसूल मंडळ समाविष्ट आहे.