बुलडाणा : अमडापूर पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. तसेच शेतकऱ्याची साेयाबीन सुडी जाळून फरार झालेल्या आराेपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
अमडापूर येथे चाेरीचा गुन्हा दाखल असलेल्या आराेपी अक्षय राजू अवसरमोल यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चाेरी गेलेला आठ हजार रुपये किमतीचा फ्रीज पाेलिसांनी जप्त केला आहे. अमडापूर पाेलीस स्टेशनअंतर्गंत येत असलेल्या शेतातील साेयाबीनची सुडी जाळून पसार झालेल्या सुनील मनोहर शेवलकर रा. टाकरखेड हेलगा यास पथकाने अटक केली. त्याची चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने अमडापूर पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सपोनि विजय मोरे, पोउपनि प्रदीप आढाव, पोहेकॉ सय्यद हारुण, नापोकॉ लक्ष्मण कटक, पोकॉ संदीप मोरे, चालक पोकॉ राहुल बोर्डे यांच्या पथकाने केली.