शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

--अशी आहे आकडेवारी-- रोज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स- ०८ रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स- ०८ --ना मास्क, ना सॅनिटायझर-- जिल्ह्यात सध्या ...

--अशी आहे आकडेवारी--

रोज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स- ०८

रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स- ०८

--ना मास्क, ना सॅनिटायझर--

जिल्ह्यात सध्या दररोज ८ ट्रॅव्हल्स सुरत, पुणे, मुंबईसाठी धावत आहेत. मात्र, यातील बहुतांश प्रवाशांकडे ना मास्क असतो, ना बसचालकांकडे सॅनिटायझर असते. बसमधील प्रवाशांच्या हातावरही क्वारंटाईनचे शिक्के मारले जात नाहीत. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र तर दूरच आहे.

-- ५ ट्रॅव्हल्सवर कारवाई--

गेल्या आठ ते दहा दिवसांत ५ ट्रॅव्हल्सवर बुलडाणा पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त अमडापूर येथेही एका ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

--ई-पासचाही अभाव--

बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास ८ ट्रॅव्हल्स धावतात. सुरत व पुण्यावरूनही दोन येतात. या ट्रॅव्हल्सवाल्यांकडे ई-पास नसतो. मुळात बुलडाण्यातून या वाहनांना ई-पासच दिल्या जात नाहीत. मात्र, त्याउपरही या ट्रॅव्हल्स धावत आहेत.

--बुलडाण्यातील ८ गाड्या बंद--

बुलडाणा जिल्हा बस असोसिएशन अंतर्गत बुलडाण्यातून आठ ट्रॅव्हल्स पूर्वी धावत होत्या. मात्र ई-पासची समस्या असल्याने सध्या ट्रॅव्हल्स चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे तूर्तास आमच्या गाड्या आम्ही बंद ठेवल्या असल्याचे बुलडाणा जिल्हा बस असोसिएशनचे पदाधिकारी धनंजय भालेराव यांनी सांगितले. असे असले तरी अन्य ठिकाणांहून ट्रॅव्हल्स धावत आहेत.

--प्रवाशांकडेही नसते वैद्यकीय प्रमाणपत्र--

ट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असतो किंवा त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के असतात. त्यातच ३० प्रवाशांचा शासन टॅक्स घेत असले तरी प्रत्यक्षात १५ प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळेही बऱ्याचदा अनेक ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी दिसून येत आहेत.