शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मोफत बियाण्यांचा लाभ केवळ २00 शेतक-यांना !

By admin | Updated: August 2, 2016 01:35 IST

बुलडाणा जिल्ह्यात मोफत बियाणे योजनेअंतर्गत ११ हजार ६२५ बियाण्यांच्या पाकिटापैकी केवळ ४३0 पाकिटांचे वाटप.

गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)पीक कर्जाच्या थकबाकीदार शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून मोफत कापूस बियाणे देण्याच्या योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शेतकर्‍यांना वितरित करण्यासाठी आलेल्या ११ हजार ६२५ बियाण्यांच्या पाकिटापैकी केवळ २१५ शेतकर्‍यांना ४३0 पाकिटांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला. मात्र शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटप करण्यासाठी उशिरा काढण्यात आलेल्या परिपत्रकाचा फटका शेतकर्‍यांच्या वाटप प्रक्रियेला बसला आहे. सन २0१२-१३ व २0१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या व सध्या थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी पीक कर्ज मिळणार नाही. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शासनाने बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने मोफत बियाणे वाटपाची योजना आखली. इंडियन र्मचंट्स चेंबर मुंबई (आयएमसी) या संस्थेमध्ये आणि शासनामध्ये २३ जून १६ रोजी सामंजस्य करार झाला. त्यानुसार राज्यातील २१ जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना कापूस व सोयाबीन बियाणे मोफत वाटपाचे नियोजन करण्यात आले; परंतु बियाणे वाटपाची प्रक्रिया, पुरवठादार कंपन्यांना दिल्या जाणारे देयके याबाबींचा समावेश करुन मोफत कापूस बियाणे पुरविण्याचे परिपत्रक ५ जुलै रोजी काढण्यात आले. शासनाने परिपत्रक काढल्यानंतर जिल्ह्यातील कृषी अधिकार्‍यांनी कापूस पेरणीचा आढावा घेतला असता बहुतांश शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा बुलडाणा जिल्ह्यामध्ये फारसा उपयोग झाला नाही. देऊळगाव राजा आणि मेहकर या तालुक्यातून तर कपाशीच्या बियाण्याची मागणीच आली नाही. बुलडाणा आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांसाठी केवळ ११२५ कपाशी बियाण्यांच्या पाकिटांचे नियोजन करण्यात आले. मात्र एकाही शेतकर्‍याने या योजनेचा लाभ घेतला नाही. चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद आणि लोणार या सात तालुक्यांसाठी आलेली बियाण्यांची सात हजार पाकिटे परत करण्यात येत आहेत. शेगाव तालुक्यात ३0, तर नांदुरा तालुक्यात ४00 पाकिटांचे वाटप शेतकर्‍यांना करण्यात आले आहे. एकंदरित ११ हजारांवर बियाण्यांचे पाकिटे आता कृषी विभागामार्फत संबंधित कंपनीला परत करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देणारी ही योजना जिल्ह्यात सपशेल अपयशी ठरली आहे.