शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:09 IST

खामगाव : गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा बसस् थानकात वावर वाढला आहे. या जनावरांकडे बसस्थानक  व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी, प्रतीक्षा गृहा तील प्रवाशांसोबतच चालक आणि वाहकांनाही या जनावरांचा  त्रास सहन करावा लागत आहे. 

ठळक मुद्देप्रतीक्षा गृहासोबतच फलाटातही जनावरांचा वावरबसस्थानक व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्षचालक आणि वाहकांनाही त्रास 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा बसस् थानकात वावर वाढला आहे. या जनावरांकडे बसस्थानक  व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी, प्रतीक्षा गृहा तील प्रवाशांसोबतच चालक आणि वाहकांनाही या जनावरांचा  त्रास सहन करावा लागत आहे.  खामगाव शहरातील विविध चौकांमध्ये गेल्या काही दिवसां पासून मोकाट जनावरांचा हैदोस आहे. या जनावरांचा वावर  शहरातील मुख्य रस्त्याप्रमाणेच आता बसस्थानक आवारातही  वाढला आहे. बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.  त्यामुळे बसस्थानकाच्या आवारातील जनावरे आता प्र तीक्षालयात पोहोचले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, बसच्या  फलाटावरही या जनावरांचे अतिक्रमण असल्याने, बस  फलाटावर लावताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

प्रतीक्षालयात घाणीचे साम्राज्य!जनावरांमुळे प्रतीक्षालयात जनावरांचे मल-मूत्र पडते. याची  नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे बसस्थानक  आवारासोबतच, फलाट आणि प्रतीक्षालयात घाणीचे साम्राज्य  पसरल्याचे दिसून येते.

शेगाव मार्गावरील उत्पन्न घटले!बसस्थानक आवारातील मोकाट जनावरांसोबतच, अवैध  प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांकडेही बसस्थानक प्रशासनाचे  दुर्लक्ष आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचा  बसस्थानकाला विळखा असतो. काही वेळा चक्क बसस्थानक  आवारातून प्रवासी पळविल्या जातात. या अवैध प्रवासी वाह तुकीचा सर्वाधिक फटका खामगाव-शेगाव मार्गावर बसला  आहे. परिणामी, खामगाव आगाराच्या उत्पन्नात चांगलीच घट  झाली आहे.