लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : एका २२ वर्षीय तरुणीची फसवणूक करून लग्न केल्याप्रकरणी त्या तरुणीने ७ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अमरावती येथील मूळ रहिवासी असलेली २२ वर्षीय तरुणी सध्या मलकापूर परिसरात राहते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रहार संघटनेचा विधानसभा प्रमुख संभाजी शिर्के याने त्या तरुणीस शहरातील जनता कॉलेजसमोरील रस्त्यावरून बुलडाणा येथे नेऊन नोंदणी कार्यालयात फसवणुकीने लग्न लावले. लग्न लावून देण्याची ही घटना ७ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान घडली आहे. त्यानंतर सदर तरुणी व तिच्या भावास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीसद्धा संभाजी शिर्केसह नि तीन भालेराव, सचिन राजपूत व रामदास डोसे यांनी संगनमत करून दिली. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध अप.नं.४२९/१७ कलम ४२0, ५0४, ५0६ (३४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय शुभांगी पाटीलकरीत आहेत.
प्रहार संघटना विधानसभा प्रमुखासह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:50 IST
मलकापूर : एका २२ वर्षीय तरुणीची फसवणूक करून लग्न केल्याप्रकरणी त्या तरुणीने ७ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
प्रहार संघटना विधानसभा प्रमुखासह चौघांवर गुन्हा
ठळक मुद्दे२२ वर्षीय तरुणीची तक्रारफसवणूक करून लग्न