शेगाव : जुगार खेळणार्या चौघांना शहर पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार सापुर्डा सुपडाजी पहुरकर, कैलास श्रीपत वानखडे, सुभाष लुलाजी खंडारे, म्हस्के सर्व रा. येऊलखेड हे चौघेजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोस्टेचे पोहेकॉं. लालसिंग चव्हाण यांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून ५२ तास पत्तेसह नगदी ६५0 असा एकूण ६७0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त चौघांविरुद्ध मुंबई जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगार खेळणारे चौघे ताब्यात
By admin | Updated: August 29, 2014 23:57 IST