शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात चार नवीन कोविड सेंटर होणार कार्यान्वित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 11:05 IST

Covid Care Centers in Buldhana : या सेंटरमध्ये जवळपास ३६० खाटा उपलब्ध राहणार आहेत. 

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच गडद होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर आणि बेड्स वाढविण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात नवीन चार कोविड सेंटर लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या सेंटरमध्ये जवळपास ३६० खाटा उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यात एक वर्षापूर्वी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला हाेता. कोरोनाबाधितांचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १४.६० टक्क्यावर आहे. तर मृत्यूदरही वाढला आहे. सध्या कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा ०.७० टक्क्यावर आला आहे. कोरोनाचा उद्रेक बघता आता आरोग्य विभागाकडूनही सुविधा वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाचे लसीकरण वाढविण्याबरोबरच कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविण्यावरही भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्याने चार कोविड सेंटरही (डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर) वाढविण्यात येत आहेत. बुलडाणा आणि हिवरा आश्रम याठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नवीन कोविड सेंटरच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. तीन सेंटरमध्ये प्रत्येक १०० आणि एका सेंटरमध्ये ६० अशा एकूण ३६० खाटा राहतील. त्यानंतरही खाटा कमी पडल्या, तर हिवराआश्रम येथे नविन १०० खाटा पुन्हा वाढू शकतात. 

या ठिकाणी सेंटर बुलडाणा शहरात तीन सेंटर वाढविण्यात येत आहेत. जिल्हा कारागृह परिसरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र याठिकाणी १०० खाटा उपलब्ध राहतील. मलकापूर मार्गावरील शासकीय आयटीआयमध्ये १०० आणि क्षयरोग केंद्रात ६० खाटांचे नियोजन आहे. हिवराआश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात १०० खाटांचे नियोजन आहे.

रुग्णांची वाढती संख्या बघता अतिरिक्त खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तसेच नवीन कोविड सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. महिला रुग्णालयात सात अतिरिक्त बेडची सुविधा, आयटीआय, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्रत्येकी १०० खाटांचे नियोजन आहे. -डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या