माजी नगरसेवकाच्या भावाची पोलिसास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:55 IST
पोलिसास माजी नगर सेवकाच्या भावाने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान स्थानिक टिपू सुलतान चौकात घडली.
माजी नगरसेवकाच्या भावाची पोलिसास मारहाण
बुलडाणा : मास्क लावलेला नसतांना विनाकारण बाहेर का फिरता अशी विचारपूस करणाºया पोलिसास माजी नगर सेवकाच्या भावाने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान स्थानिक टिपू सुलतान चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने कुणालाही विनाकारण फिरण्यास मनाई आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास चार ते पाच तरुण दुचाकीवरुन जात होते. ड्युटीवरील पोलिस राजेश निकाळजे यांनी त्यांना विचारपूस केली. मास्क लावलेला नसतांना नाहक कुठे फिरता अशी विचारणा केली. यावेळी माजी नगरसेवक युनूस खान यांचा भाऊ जावेद खान इसाक खान याने हातातील काठी हिसकावून मारहाण करीत खाली पाडले. आजूबाजूला ड्यूटीवर असलेल्या सहकाºयांनी पोलिसास सोडविले. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये शासकिय कामात अडथळा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय काळे करीत आहे.