शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:47 IST

Lonar Crater ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समिती’ या दोन समित्यांचा समावेश आहे.

बुलडाणा: लोणार सरोवर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने दोन समित्यांची स्थापना केली आहे. यात अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समिती’ या दोन समित्यांचा समावेश आहे.

लोणार सरोवराचा विकास करून त्याला पर्यटनाच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्यासाठी या समित्या गठीत केल्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.लोणार सरोवर हा जागतिक वारसा संवर्धन, जतन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेल्या निरीक्षण व सूचनांनुसार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देश नुसार या समित्यांचे गठण करण्यात आले. जगविख्यात ठेवा असलेला लोणार सरोवर परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लोणार दौरा केला होता. त्यानंतर विकास निधी आणि त्यादृष्टीने नव्याने समित्यांचे गठण करण्यात आले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ फेब्रुवारी रोजीच अनुषंगीक आदेशही पारीत केला असल्याची माहिती खा. प्रतापराव जाधव यांनी दिली.

लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समितीमध्ये अमरावती विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असून बुलडाणा जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. यासोबतच प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर), मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (अमरावती), जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता (अमरावती), भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक (नागपूर), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक (अमरावती), न्यायालयीन मित्र, उपविभागीय अधिकारी व लोणार पालिकेचे मुख्याधिकारी यात सदस्य म्हणून राहतील.यासोबतच लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिव हे काम पाहतील. या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, आराखड्याची संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, लोणार पालिकेचे मुख्याधिकारी हे सदस्य राहतील. पर्यटन विभागाचे सहसचिव सदस्य हे समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.

 विकासासाठी कटिबद्ध - जाधव जागतिक आकर्षण असलेल्या लोणारला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. लोणार विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत असे खा. प्रतापराव जाधव म्हणाले.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा