शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या पिल्लासाठी वन विभागाची उपाययोजना

By admin | Updated: December 11, 2015 02:32 IST

मचानासह पिंजरा व स्वयंचलित कॅमेर्‍याद्वारे मोताळा वन विभागाच्या कर्मचा-यांचा जागता पहारा.

मोताळा (जि. बुलडाणा): शेलापूर शिवारात ८ डिसेंबर रोजी आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लास मादीने सुखरूप जंगलात घेऊन जावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मोताळा वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी संजय होले यांच्या शेतात मचानासह पिंजरा व स्वयंचलित कॅमेर्‍याद्वारे जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे; मात्र बुधवारी ९ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंंत बिबट मादीचे पिल्लू जागेवरच असून, या मादीचे मात्र अद्याप दर्शन वन विभागाला झाले नाही. शेलापूर-तळणी शिवारातील संजय होले यांच्या शेतामध्ये मंगळवारच्या सकाळी कापूस वेचत असताना नवजात बिबट मादीचे पिल्लू एका महिलेच्या दृष्टीस पडले होते. घटनेची वन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती पडल्यावर डीएफओ भगत, आरएफओ कोळ, पायघन, वन परिक्षेत्र अधिकारी पी. टी. कसले, वनपाल संजय राठोड, वनरक्षक नागरे, देशमुख, तवलारकर, मुंजाळकर, लवंगे, सोनुने व गणेश जाधवसह रेस्क्यू टीमच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत बिबटच्या पिल्लास संरक्षण देऊन त्याच्या मूळ जागेवर ठेवले होते. आणि रात्र भर परिसरातील शेतकर्‍यांना सावधानतेचा इशारा देऊन मादीने पिल्लास सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे यासाठी जागता पहारा दिला होता. रात्रीत बिबट मादीने पिल्लाला घेऊन न जाता दुसर्‍या जागेवर उचलून ठेवून दिले. दुसर्‍या दिवशी सकाळी वन विभागाच्या पथकाला ही बाब समजली. दरम्यान, मंगळवारी पुन्हा दिवस व रात्र वन विभागाचे व रेस्कूय टीमचे कर्मचारी त्या ठिकाणी ठाण मांडून जागता पहारा देत आहेत. मादीने आपल्या पिल्लाला नैसर्गिकरीत्या सुखरूप जंगलात न्यावे यासाठी कर्मचार्‍यांकडून उंच मचान निर्माण करण्यात आले असून, त्या खाली पिंजरा ठेवण्यात आला आहे. तसेच स्वयंचलित कॅमेर्‍याद्वारे बिबट मादीचे पिल्लू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाची पाहणी सुरू आहे.