शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्ह्यात रंगणार फुटबॉल फेस्टीवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:20 IST

जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल आहे. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने राज्यात होत आहे. यामध्ये एकूण 24 देशांचे संघ सहभागी होणार आहे. राज्यात स्पर्धेच्या अनुषंगाने फुटबॉल खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी फुटबॉल मिशन 1 मिलीयन कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2017 रेाजी फुटबॉल फेस्टीवल रंगणार आहे. अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.

ठळक मुद्दे 15 सप्टेंबर रेाजी रंगणार जिल्ह्यात फुटबॉल फेस्टीवलजिल्ह्यातील 587 शाळांचा असणार सहभागफुटबॉल वर्ल्ड कप  स्पर्धेच्या अनुषंगाने  फुटबॉल मिशन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल आहे. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने राज्यात होत आहे. यामध्ये एकूण 24 देशांचे संघ सहभागी होणार आहे. राज्यात स्पर्धेच्या अनुषंगाने फुटबॉल खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी फुटबॉल मिशन 1 मिलीयन कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2017 रेाजी फुटबॉल फेस्टीवल रंगणार आहे. अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.फुटबॉल फेस्टीवलची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) देशमुख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदी उपस्थितहोते. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या शाळा व वसतीगृह तयारीला लागले आहे. फुटबॉलचे सामने 15 सप्टेंबर 2017 रोजी होणार असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.   जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 587 शाळा या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. तसेच स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या 287 शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल, तर शाळा नोंदणी न केलेल्या शाळांना प्रत्येकी 2 फुटबॉल देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात या फेस्टीवलमध्ये 30 महाविद्यालये, न.पच्या 8 शाळा सहभागी होणार असून 720 ठिकाणच्या मैदानांवर फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने आयोजित केल्या जाणार आहे. फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने पाच ठिकाणी विशेष सेल्फी पॉईंटची उभारणी केली आहे. त्यामध्ये शेगांव येथील आंनद सागर प्रवेशद्वार, नांदुरा येथील हनुमान मुर्तीजवळ, लोणार सरोवराजवळ, सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्याजवळ आणि हिवरा आश्रम येथील विवेकानंद नगर या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात किमान 50 हजार खेळाडू एकाच दिवशी फुटबॉल खेळतील याबाबत प्रयत्न सुरू आहेत.  फुटबॉल फेस्टीवलमध्ये 30 बाय 20 मीटर प्रमाणे मैदान आखणी करण्यात येणार असून 15 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 8 ते 12 सामने खेळविले जातील. प्लॅस्टीक कोन, विटा आदी साहित्य वापरून गोलपोस्ट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक सामना हा 30 मिनीटांचा असणार आहे. मध्ये 5 मिनीटांचा ब्रेक असणार आहे. एका संघात पाच खेळाडू राहतील. तसेच दोन खेळाडू राखीव असतील. एकापेक्षा जास्त संघ असतील तेथे संघ क्रमांक ठरवून देण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली.