शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसूत्री पाळा, कोरोना संसर्गाला हरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता आता तरी नागरिकांनी स्वतःही संसर्गाची साखळी तोडण्यास पुढाकार घेतला पाहिजे. एखाद्या आजाराची साथ आली ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता आता तरी नागरिकांनी स्वतःही संसर्गाची साखळी तोडण्यास पुढाकार घेतला पाहिजे. एखाद्या आजाराची साथ आली की, नागरिकांनी जबाबदार वर्तन करून प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ, हे वैद्यकशास्त्राचे महत्त्वाचे तत्त्व आहे. साथीच्या आजाराच्या प्रतिबंधाच्या तीन पायऱ्या असतात. पहिल्या पायरीत आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती, आजारापासून संरक्षण, हे दोन महत्त्वाचे बिंदू आहेत. यावर सरकार काम करत आहे; परंतु त्यात संपूर्ण समाजाचा सहभाग असेल, तर त्याची परिणामकारता वाढू शकेल. खासकरून पालक, शिक्षक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, समाजसेवकांनी एकत्रितपणे साथीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी काम केल्यास तो प्रभावीपणे आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होईल. कोरोनाबाधित रुग्णाच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. त्या तुषारांमध्ये हे अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येत असतात. अशा वेळेस त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या श्वासातून ते विषाणू त्यांच्या श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात. दुसरा प्रकार म्हणजे खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूंच्या वस्तूंवर पडतात. म्हणजे टेबल, खुर्ची, दरवाजा, बसच्या सीट्स‌ इत्यादी. या वस्तूंवर हे विषाणू बराच काळ जिवंत राहतात. मग अशा वस्तूंना कुणी निरोगी व्यक्तीने हस्तस्पर्श केला आणि त्याचे ते हात नंतर स्वतःच्या चेहऱ्याला, नाकाला, तोंडाला लावले, तर त्या निरोगी व्यक्तीला या विषाणूंचा संसर्ग होतो. प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. - डॉ. पंजाब शेजोळ, हृदयरोगतज्ज्ञ, कोविड केअर सेंटर, मेहकर.

किती जणांना आपल्याकडून होऊ शकतो संसर्ग

१. संसर्ग झालेल्या एकाकडून इतरांना संसर्ग होण्याची सरासरी संख्या म्हणजे मानवी संक्रमण पल्ला २.२ ते ३.९ यादरम्यान आहे. म्हणजे संसर्ग झालेली एक व्यक्ती साधारणपणे २.२ ते ३.९ व्यक्तींना संसर्ग पोहोचवू शकते.

२. प्रत्यक्षात लोकांमध्ये अंतर राखून आपण संक्रमणात कपात करून संसर्गाचे प्रमाण कमी करू शकतो.

३. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वीच दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो, अशा बहुतेक वाहकांमध्ये कोणती लक्षणे दिसतही नाहीत. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड झाकून घेतले, तर संसर्गाचे प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते.

४. हा विषाणू ज्याला संसर्ग झाला आहे, त्याच्या संसर्गकाळातील लाळ, थुंकी, विष्ठेत असतो.