शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लोणार सरोवरावर प्रथमच झाले ‘फ्लेमिंगो’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:25 IST

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोचे  दर्शन लोणारकरांना झाले आहे.

- किशोर मापारी लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : परदेशी पाहुणे फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरात आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचे पाय जलाशयाच्या दिशेने पडू लागले आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोचे  दर्शन लोणारकरांना झाले आहे.थंडीची चाहूल लागली, की आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत हे पक्षी लोणार सरोवरात दाखल होत असतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. शेकडोंच्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात. भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. या पक्ष्यांचे थवेच्या-थवे असल्याने पाण्यात त्यांच्या जणू काही कवायती चालल्याचा भास होतो. काही वर्षापासून समाधानकारक पाऊस नसल्याने व खोल बोअरचे प्रमाण वाढल्याने लोणार सरोवरात पाणीसाठा कमी होत आहे. पाणथळीच्या जागा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खाद्य मिळत नव्हते. त्यामुळे काही वर्षात पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षीप्रेमींची निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. यावर्षीच्या समाधानकारक पावसाने सरोवर परिसर हिरवाईने नटलेला असल्याने मागील दोन दिवसांपासून फ्लेमिंगो दाखल झाल्याने पक्षी प्रेमींत उत्साहाचे वातावरण आहे.महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन रोहित पक्ष्यांच्या सुंदर ‘कवायती’ पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत. रोहित पक्षांचे आगमन उशिरा झाले असले, तरी या ठिकाणी सिगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या आदी जातींचे पक्षी दाखल झाल्याने जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर चांगलेच बहरून गेले आहे. राज्यातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.

फ्लेमिंगोचे वैशिष्ट्य२६ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी मी लोणारकर टीमचे पक्षीमित्र विलास जाधव व संतोष जाधव यांनी सरोवराला भेट दिली असता रोहीत पक्षाचे अस्तित्व लोणार सरोवरात दिसून आले. रोहीत पक्षी काही विशिष्ट प्रकारचे शेवाळ खातात. यामुळे त्यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते, हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्षाची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्षाला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. एकंदरीत लोणार वन्यजीव अभयारण्य आता खऱ्या अर्थाने समृद्ध होत आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा