शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

ज्योत पेटली..पण

By admin | Updated: September 7, 2014 00:17 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाचा गुंता अजून चर्चेतही आला नाही.

राजेश शेगोकार / बुलडाणाकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाचा गुंता अजून चर्चेतही आला नाही. या दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची एकत्रित बैठकही झाली नाही तरीसुद्धा काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ करून प्रचार ज्योत गावागावात पाठविल्या आहेत. जिल्ह्यातही ही प्रचार ज्योत दाखल झाली असून, खामगाव-चिखलीत प्रचाराचा शुभारंभही झाला आहे. हा शुभारंभ अगदी थाटामाटात झाला असला तरी एकदा उमेदवारी जाहीर झाली की हीच प्रचाराची ज्योत ह्यटेंभाह्ण होते व आपल्याच घराला आग लावते या इतिहासालाही या निमित्ताने उजाळा मिळाला आहे. काँग्रेसची ही प्रचाराची ज्योत आता गावागावात जाईल पण..या ज्योतीचे पुढे नाराजांच्या हातातील ह्यटेंभाह्ण मध्ये रूपांतर होणार नाही याची गॅरंटी कोणालाच नसल्याने सध्या तरी सारे वेट अँन्ड वॉच याच भूमिकेत आहेत.खरं तर काँग्रेस हा पक्ष भक्कम असा जनाधार असलेला पक्ष; मात्र या पक्षाची गेल्या काही वर्षात सामान्यांशी नाळ तुटली, घोटाळे वाढले व त्याचा परिणाम लोकसभेत दिसून आला. आता विधानसभेचे वेध लागले असताना काँग्रेसने आता धडा घेतला पाहिजे. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करते, हे विधान ज्यांनी केले ती व्यक्ती खरोखरच द्रष्टा होती. या विधानाच्या अनुषंगाने जिल्ह्याचा विचार केला, तर प्र त्येक निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरोधात होणारी ह्यहारकिरीह्ण ही घरातूनच झाल्याची बाब स्पष्टपणे समोर आली आहे. निकालानंतर पराभूत उमेदवार पराभवाचे खापर फोडतांना ह्यगद्दारीह्णचा मुद्दा हमखास मांडतो. ही गद्दारी कधी पक्षातून तर कधी मित्रपक्षातून होते. हा सर्व इतिहास जिल्ह्याला नवीन नाही. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. पाच मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवारांची नावे राज्यस्तरीय स्क्रिनिंग कमेटीकडून आता राष्ट्रीय समितीकडे गेली आहेत. या नावांच्या यादीमध्ये माझेच नाव आहे असा दावा प्रत्येक इच्छुक करीत असल्याने ही स्पर्धा पक्षापेक्षाही मोठी होती व हीच स्पर्धा पुढे निवडणुकीत उमेदवाराच्या विरोधात जागोजागी ह्यटेंभाह्ण लावून आग लावते. काँग्रेसच्या प्रचार ज्योतीच्या प्रकाशात हा इतिहास अगदी ठळकपणे प्रकाशात आला असल्याने आता तरी नेते यापासून काही धडा घेतील ही सामान्य कार्यकर्त्यांंची अपेक्षा असणे गैर नाही. एकीकडे काँग्रेसमध्ये असे वातावरण असतानाही अँड. हरिष रावळसारखा चळवळया नेता पक्षामध्ये प्रवेश करतो ही बाब काँग्रेससाठी समाधानाची आहे, पण लक्षात घेतो कोण.? काँग्रेसने धुमधडाक्यात प्रचार सुरू केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे. बुलडाणा, जळगाव जामोद या दोन अतिरिक्त म तदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा असून, अद्यापपर्यंंत जागा वाटपाचा गुंता चर्चेत आला नाही. निवडणुकीत आघाडी म्हणून एकत्रितरित्या जनतेसमोर जावे लागणार असले तरी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेऊन ह्यएकला चलो रेह्णच्या भुमिकेची मुहूर्तमेढ तर रोवली नाही ना? अशी शंकाही घेतल्या जात आहे. राष्ट्रवादीच्या मेहकर व सिंदखेडराजा या दोन्ही मतदारसंघातही काँग्रेसची प्रचार ज्योत जाणार असल्याने राष्ट्रवादीच्या अस्वस्थतेत भरच पडत आहे. मित्रपक्षातील अशी छुपी नाराजी तर दुसरीकडे पक्षातील उमेदवारीनंतरच्या संभाव्य नाराजीचा सामना काँग्रेसला करावा लागणार आहे. त्यामुळे प्रचाराची ज्योत पेटली..पण पुढे त्याचा टेंभा होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती होते हे विधानही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंंना पाठ करावे लागेल एवढे निश्‍चित.आघाडीचा गुंता कायमच आहे. राष्ट्रवादीला दोन मतदारसंघ हवे आहेत. तो निर्णय प्रलंबित आहे. काँग्रेसमध्येच उमेदवारीची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. तरीसुद्धा काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ करून प्रचार ज्योत गावागावात पाठविल्या आहेत. जिल्ह्यातही ही प्रचार ज्योत दाखल झाली असून, खामगाव-चि खलीत प्रचाराचा शुभारंभ झाला त्यामुळे ज्योत काय उजेड पाडते, याकडे लक्ष लागले आहे.