शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या पाचही शाळांना आय.एस.ओ. मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:49 IST

राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनु.जाती व मागासवर्गीय मुलांमुलींसाठी एकूण ८४  शाळा कार्यरत आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण ,मोफत निवास, निसर्गरम्य असा शालेय परिसर, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन, पालक व समाज उद्बोधन, विविध सामाजिक व शालेय असे नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक सहली, मर्यादित प्रवेश संख्या आणि वार्षिक स्नेहसंमेलने आदी बाबींमुळे जिल्ह्यातील पाच ही  शाळांनी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केले आहे.

ठळक मुद्देराज्यात एकूण ८४  शाळा लोणार, शेगाव, खामगाव, वळती व कोलवड येथील शाळाशिक्षणाचा दर्जा व इतर बाबी उत्तम असल्यामुळे झाली निवड

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनु.जाती व मागासवर्गीय मुलांमुलींसाठी एकूण ८४  शाळा कार्यरत आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण, मोफत निवास, निसर्गरम्य असा शालेय परिसर, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन, पालक व समाज उद्बोधन, विविध सामाजिक व शालेय असे नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक सहली, मर्यादित प्रवेश संख्या आणि वार्षिक स्नेहसंमेलने आदी बाबींमुळे जिल्ह्यातील पाच ही  शाळांनी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केले आहे.पूर्वी समाजकल्याण आणि आश्रमशाळा यांचेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा होता. पण आज हा दृष्टिकोन पुसत विभागाच्या शाळा यशाचे शिखर सर करू पाहत आहेत. त्याचेच एक आदर्श उदाहरण म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार असणाºया बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, शेगाव, खामगाव,  वळती (चिखली), कोलवड (बुलडाणा) येथे असलेल्या प्रत्येकी २०० विद्यार्थी क्षमता असलेल्या आश्रम शाळांनी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केले आहे. आज या शाळा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत आहेत. सद्यस्थितीला या शाळांच्या भौतिक सुविधा आणि गुणवत्ता ह्या वाखाणण्याजोग्या आहेत. सदर शाळांचे विद्यार्थी हे शालेय व शाळाबाहय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि सामाजिक न्याय विभागाचे नावलौकिक करीत आहेत. याचे सर्व श्रेय हे जिद्द, चिकाटी व मेहनतीने शाळेत अहोरात्र काम करत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला तसेच कुशल सेनापतीप्रमाणे आपली सेना उत्कृष्टरित्या सत्कर्मी लावणारे सर्व मुख्याध्यापक आणि तुटपुंज्या पगारावर काम करणारे तासिका शिक्षक व क्रिस्टल कर्मचारी यांना जाते. 

भविष्यात जिल्ह्यातील विभागाचे सर्व वसतिगृहे सुद्धा आय.एस.ओ.  करण्याचा मानस आहे. याचीच प्रचिती म्हणून आज जिल्ह्यातील पाचही शाळा आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाल्यात. तसेच विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर आणि अनुराधा ओक, उपसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शाळा भौतिक सुविधा आणि गुणवत्ता वाढीसाठी विडा उचललेला आहे.- प्र.घ.गिरी, मुख्याध्यापक, अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, लोणार .