सिंदखेडराजा: महाराष्ट्र शासनाने शिक्षण हक्क कायदा २00९ च्या निकषानुसार ज्या शाळांची पटसंख्या २0 पेक्षा कमी आहे; अशा शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे तालुक्यातील ५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून बंद होणार असल्याचे दिसुन येत आहे. शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या खासगी प्राथमिक शाळांचे जाळे हळूहळू वाढत आहे.विद्यार्थ्यांचा कलही इंग्रजी शाळांकडे वाढलेला दिसतो. साखरखेर्डा येथील खासगी शाळेत ११२0 पर्यंत विद्यार्थी संख्या दिसून येते तर साखरखेर्डा परिसरातील सावंगीभगत, शेवगा जहॉगीर, जनुनावाडी आणि वर्दडी परिसरातील प्राथमिक शाळांची पटसंख्या २0 पेक्षा कमी असल्याने येत्या जुलैपासून सदर शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पाच प्राथमिक शाळा होणार बंद!
By admin | Updated: May 20, 2014 00:40 IST