बुलडाणा : गाडीच्या डिक्कीत असलेली पाच लाख रुपयांची रक्कम ओरिएंटल बँकेसमोर लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विकास नरेंद्र बाहेकर (वय ३0) रा. शांती निकेतननगर बुलडाणा यांनी फिर्याद दिली, की बुलडाणा अर्बन बँक मुख्य शाखेतून त्यांनी पाच लाख रुपयांची रोकड काढली. सदर रक्कम त्यांनी आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवली व त्यानंतर ते ओरिएंटल बँक सुंदरखेड शाखा याठिकाणी ११ ते १२ च्या दरम्यान धनादेश आणण्यासाठी आत गेले तेव्हा अज्ञात चोरट्याने गाडीची डिक्की उघडून त्यातील पाच लाखांची रोकड चोरून नेली. परत आल्यानंतर ही बाब फिर्यादीच्या निदर्शनास आली. यावरून बुलडाणा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार अशोक हिवाळे करीत आहेत.
पाच लाखांची रोकड लंपास
By admin | Updated: June 16, 2016 02:22 IST