शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वनराई बंधा-यांमुळे केदार नदी तुडुंब!

By admin | Updated: October 29, 2016 02:38 IST

बुलडाणा जिल्ह्यात लोकसहभागातून जलक्रांती!

सुहास वाघमारे नांदुरा, दि. २८- नायगाव परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केदार नदीवर पाच वनराई बंधारे तयार केले असून, त्यामुळे नदीचे पात्र तुडुंब पाण्याने भरले आहे. परिसरातील कोलासर, तिकोडी, शेलगाव मुकुंद व नायगाव या चार गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे. नायगाव येथील निनाजी तायडे यांनी गावातील नागरिकांजवळ लोकसहभागातून वनराई बंधारे बांधून जलसंवर्धन करण्याचा मानस व्यक्त केला. केदार नदी पात्रात पाच बंधारे तयार करण्याचे ठरले. त्याकरिता देवेंद्र डामरे, रमेश डामरे, केदार ढोरे, सचिन तायडे, मयूर तायडे, नितीन तायडे, भागवत डामरे, आशिष तायडे, सभापती अनिल इंगळे, ग्रामपंचायत प्रतिनिधी व गावकरी आदींनी त्या पाच बंधार्‍यांचा आर्थिक भार उचलला. प्रत्येक वनराई बंधारा हा आठ ते दहा फूट रुंद व सहा ते सात फूट उंच माती, मुरूम व रेतीच्या सहाय्याने तयार करण्यात आला. त्या बंधार्‍यातून पाणी पाझरू नये, याकरिता प्लास्टिक कागद व ताडपत्री याचा वापर करून पाणी साठविण्यात आले आहे. या प्रयत्नामुळे तीन किलोमीटर नदी पात्रात पाणी साठले असून, भूजल पातळीत झपाट्याने वाढ झाली. याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांना होत आहे. कोणताही शासकीय निधी व अधिकार्‍यांचे सहकार्य न घेता लोकसहभागातून झालेली ही जलक्रांती प्रेरणादायी आहे. या उपक्रमात त्यांना पंचायत समिती सभापती अनिल इंगळे, दिनकर गारमोडे, रामकृष्ण सपकाळ, नारायण डामरे, सुयोग माहुलकार, भागवत डामरे, गोविंदा चोपडे, गणेश सपकाळ, वाघ तसेच गावकर्‍यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. बंधारे बांधणारा अवलीया.नायगाव येथील निनाजी तायडे हे नायगाव येथील मानधन तत्त्वावर काम करणारे पोस्ट मास्टर आहेत. त्यांच्या नोकरीनंतरच्या वेळेत गावात स्वच्छता व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविणार्‍या तायडे यांना जलसंवर्धनाचे वेड आहे. प्रत्येक वर्षी गावातील तरुणांना एकत्रित करून लोकसहभागातून बंधारे गाव परिसरात व बाहेर तयार करण्यात ते पुढाकार घेतात. या कामासाठी आर्थिक झीजही त्यांना सोसावी लागते.-नायगाव येथील गावकर्‍यांनी लोकसहभागातून पाच बंधारे तयार केले असून, नदीचे पात्र तीन किलोमीटरपर्यंंत तुडुंब भरले आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. लोकसहभागातीलही जलक्रांती प्रेरणादायी आहे.- अनिल इंगळे,सभापती पं.स. नांदुरा.