शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेस पाच दिवसांची मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:47 IST

धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

- नवीन मोदेधामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आठ एप्रिल रोजी सुरू झालेली ही स्पर्धा आता २२ मे ऐवजी २७ मे रोजी संपेल. त्यामुळे राज्यातील ७६ तालुक्यातील सहा हजार गावांना अधिक चांगले काम करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा वेळ मिळणार आहे.या वर्षीची दुष्काळी परस्थिती, निवडणुकीची आचार संहिता ह्या सर्व बाबी विचारात घेता पाणी फाऊडेशनतर्फे स्पर्धा काळात पाच दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय आठ मे रोजी घेण्यात आला आहे.मागील चार वर्षापासून राज्यातील ९० टक्के दुष्काळी भागात आठ एप्रिल ते २२ मे या दरम्यान ही स्पर्धा ४५ दिवस सर्व राज्यभर राबविली जाते. परंतू यावर्षी स्पर्धेचा कालावधी ५० दिवसांचा राहील. त्यानुसार २७ मे पर्यंत सहभागी गावांना कामे करता येतील. २८ मे रोजी कामाचे मोजमाप व तपासणी होईल. संपूर्ण राज्यात दुष्काळामध्ये हजारो गावे होरपळी जात आहेत. गावकर्यांची एकजूट आणि  श्रमदानाच्या जोरावर लोकांमध्ये जनजागृती करून जलसंवर्धनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करून घेण्यात पाणी फाऊंडेशन यशस्वी होत आहे. २०१६ मध्ये अवघ्या तीन तालुक्यात, २०१७ मध्ये ३० तालुक्यात, २०१८ मध्ये ७५ तालुक्यात आणि २०१९ मध्ये ७६ तालुक्यातील सहा हजार गावापर्यंत दुष्काळाला हद्दपार करणारी लोकचळवळ आता पोहोचली आहे.या वर्षी स्पर्धाकाळाच्या पाच दिवसांच्या मुदतवाढीने सहभागी गावांना आपली कामे अधिक चांगली करण्यासाठी पुरेसा वेळ व बळ मिळेल, अशी माहिती पाणी फाऊंडेशनच्या समन्वयक बिंदिया तेलगोटे यांनी दिली.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाbuldhanaबुलडाणा