शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात मुलाने केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील समतानगरात राहत असलेले गजानन संपत गवई (५५) हे अमडापूर येथील जिल्हा ...

मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील समतानगरात राहत असलेले गजानन संपत गवई (५५) हे अमडापूर येथील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक होते. घरामध्ये ते त्यांची पत्नी व २१ वर्षीय मुलगा शुभम राहतो. औरंगाबाद येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला तो आहे. दरम्यान, शनिवारी शुभमचे वडील गजानन गवई हे घरातच आराम करत असताना शुभमने रागाच्या भरात कुऱ्हाडीचे वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जातो म्हणून तो घरातून बाहेर पडला. दरम्यान, या प्रकाराबाबत शेजारच्यांनी मेहकर पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोढे व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शुभमशी संपर्क साधला असता तो मेहकर पोलीस ठाण्याच्या परिसरातच घुटमळत होता तेथून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मेहकर पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये शुभम हा मानसिक रुग्ण होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याच्यावर उपचारही सुरू होते असे पोलिसांनी सांगितले. आई-वडिलांनी अभ्यास कर, मोबाईल कमी बघ, असे म्हटले की, तो चिडचिड करायचा त्यातूनच त्याने वडील गजानन गवई यांचा खून केला असावा असा कयास प्राथमिक स्तरावर पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी व्यक्त केला आहे. मृत गजानन गवई यांना शुभमसह चार मुली असून त्या विवाहीत आहेत. या घटनेचा पुढील तपास सध्या मेहकर पोलीस करत आहेत.