शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवा महोत्सात अनुराधा अभियांत्रिकेचे विद्यार्थी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:38 IST

चिखली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे अमरावती येथे  आयोजित विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवामध्ये स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील चमुने सक्रीय सहभाग नोंदवित क्वीज (प्रश्नमंजुषा)  या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे आयोजित महोत्सवातक्वीज (प्रश्नमंजुषा)  या प्रकारात  मिळविला प्रथम क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे अमरावती येथे  आयोजित विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवामध्ये स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील चमुने सक्रीय सहभाग नोंदवित क्वीज (प्रश्नमंजुषा)  या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे.अमरावती येथे २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या युवा महोत्सवामध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गौरव शिवाजीराव बावीस्कर, गौरव विजय भाकरे, अदनान इम्रानोद्दिन काझी यांच्या चमुने हे यशसंपादीत केले आहे़ अमरावती विद्यापिठातील १९६ महाविद्यालयाच्या चमुने प्रश्नमंजुषा या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता़ या स्पर्धेची पूर्व लेखी चाचणी २७ सप्टेबर रोजी घेण्यात आली होती. यामध्ये अव्वल चार महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. २८ सप्टेबर रोजी आयोजित अंतिम फेरीमध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमुने प्रथम क्रमांक प्राप्त केला़  स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा़ देवेंद्र प्रभुणे यांनी काम पाहिले. दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आॅन स्पॉट पेंटिंग, क्ले मॉडलींग, पोस्टर मेकिंग, कोलाज, वक्तृृत्व, वादविवाद आदी कलाप्रकारात सक्रीय सहभाग नोंदवित युवा महोत्सवात आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले़  विजेत्या चमुतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा़ डॉ.राजेंद्र कोकाटे, प्रा.गुरुदासाणी, प्रा.मापारी यांची उपस्थिती होती़ विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.मंगेश कडु यांचे मार्गदर्शन लाभले असून चमु व्यवस्थापक म्हणून प्रा.विंचूरकर यांनी काम पाहिले़ या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब बोंद्रे, सचिव आ.राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर.यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.