शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सावळा होणार जिल्ह्यातील पहिले धूरमुक्त गाव!

By admin | Updated: July 6, 2017 00:07 IST

रविकांत तुपकर यांच्या प्रयत्नातून सावळा येथे ७५ गॅस जोडणी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : बुलडाणापासून हाकेच्या अंतरावर असलेले सावळा हे शेतकरी नेते तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांचे गाव. या गावाचा तुपकरांनी अल्पावधीतच विविध विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केला आहे. दरम्यान, गाव धूरमुक्त व्हावे व गाव परिसरातील वनराई टिकून राहावी, यासाठी ना.तुपकरांच्या प्रयत्नाने सावळा येथे ७५ गॅस कनेक्शन मंजूर झाले असल्याने, सावळा हे गाव जिल्ह्यातील पहिले धूरमुक्त गाव होणार आहे.सावळा हे गाव डोंगराच्या कडेला वसलेले असून, आजूबाजूला घनदाट जंगल परिसर आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलातील वृक्षांची सातत्याने कत्तल होते. वृक्षांची कत्तल थांबाविण्यसाठी वन विभागामार्फत गाव पातळीवर वन समिती स्थापन करून समितीमार्फत लाभार्थींना २५ टक्के रक्कम भरून वन विभागामार्फत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात येते. या योजनेचा १०० टक्के लाभ मिळवून देण्यासाठी ना. तुपकरांनी वन विभागाचे अधिकारी, वन समिती अध्यक्ष, सचिव यांची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यात सावळा येथील ४१ लाभार्थींना गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून दिला होता. दरम्यान, उर्वरित सर्वच लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १६ मे रोजी उपवनसंरक्षक बी.टी. भगत व वन समितीचे अध्यक्ष डॉ. भानुदास जगताप, सचिव पी.एन. जाधव व वन परिक्षेत्र अधिकारी झोळे यांच्यासमवेत ना. तुपकरांनी बैठक घेऊन गावातील सर्व लाभार्थींना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी वन विभागाला निर्देश दिले होते. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत वन विभागाकडून उर्वरित ७५ लाभार्थींना गॅस कनेक्शन मंजूर करण्यात आले असल्याने ना. तुपकरांच्या प्रयत्नांना यश आले आहे.