शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात बंधारे ‘ओव्हर फ्लो’

By admin | Updated: June 15, 2017 02:03 IST

जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान : कृषी विभागाने बांधले होते बंधारे

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव कुंंडपाळ : लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ परिसरात १३ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सातही सिमेंट बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसाने अनेक झाडांची पडझड झाली असून, शेत जमिनही खरडून गेली आहे. तसेच कृषी विभागाअंतर्गत करण्यात आलेले ढाळीचे बांधही पावसा्च्या पाण्याने फुटले असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीस प्रारंभ केल्याने पेरणी केलेल्या शेतात पाणी साचले असून बियाणे खापूले असल्याने उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीच्या समस्येने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. लोणार तालुका कृषी कार्यालयाच्या पुढाकारातून देऊळगाव कुंडपाळ शिवारात सात सिमेंट बंधाऱ्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले. यावर्षी पवसाला लवकरच सुरूवात झाली. १३ जून रोजी अचानक आलेल्या या वादळी पावसाने ते पूर्णपणे भरुन ओव्हर फ्लो झाले आहेत. कृषी विभागाच्या वतीने देऊळगाव कुंडपाळ शिवारात रमेश नरवाडे, रामभाऊ नरवाडे, सौ. अल्काताई राठोड, बबनराव सरकटे, भास्करराव सरकटे आणि दिलीप सरकटे यांचे शेतातील नदीवर प्रत्येकी पाच लक्ष खर्च करुन सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. भूगर्भातील जलस्तर वाढण्याच्या हेतुने सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यंदा प्रथमच ते पूर्णपणे भरुन ओव्हर फ्लो झाले आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतीचेही नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार!लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे कृषी विभागाने केलेल्या सिमेंट बंधऱ्यात पहिल्याच पावसाने मोठ्या प्रमाणावार पाणी साचल्याने या भागातील शेतीच्या सिंचनाची सुविधा होणार आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवल्याने हे पाणी जमिनीत मुरून परिसरातील जमिनीचा ओलावा कायम राहण्यास मदत होणार आहे. पर्यायाने खरीपा बरोबरच रब्बीच्या पिकांनाही सोय होणार आहे. अशाच प्रकारे कृषी विभागाने महत्वाच्या नद्या नाल्यावर बंधारे बांधून पाण्याची साठवणूक केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा या संदर्भात जनजागृती करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. यातून शेतीच्या उत्पन्नात निश्चित भर पडण्यास मदत होणार आहे.